गौड सारस्वत ब्राह्मण समाजातर्फे संगीत कार्यक्रम

प्रतिनिधी/ बेळगाव
गौड सारस्वत ब्राह्मण समाजाच्यावतीने कोजागरी पौर्णिमेनिमित्त अनगोळ येथील सिटी हॉल सभागृहात संगीताचा कार्यक्रम झाला.
प्रारंभी तन्मयी सराफ हिने स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंर स्वामिनी शहापूरकर यांनी ‘ठुमक चलत रामचंद्र’ राज बिच्चु यांनी ‘बहूत दिन नच भेटलो’, श्रीज ढानी यांनी ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ मृगनयनी, शेखर खानोलकर यांनी चांद माझा हा मातला, प्रिया आज माझी, कशासाठी येऊ देवा, भरे मनात सुंदरा, श्रद्धा कर्नाटकी यांनी ऋतुराज आजवनी आला, राजेंद्र कर्नाटकी स्वरगंगेच्या काठावरती आदी विविध सुमधुर गीते सादर करून रसिकांची टाळ्यांच्या गजरात दाद मिळाविली. यावेळी मुकुंद गोरे यांनी हार्मोनियम व कुलकर्णी यांनी तबला साथ दिली.
यावेळी अध्यक्ष सुनील नाईक, कार्यवाह राघव हेरेकर, उपाध्यक्ष रायश्री देशपांडे, आनंद वेलंगी, खजिनदार विलास खब्बे, उपकार्यवाह संदीप कोलवलकर, आदीसहीत कार्यकारी मंडळ व समाज बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.