|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे आज दोन तासांसाठी बंद

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे आज दोन तासांसाठी बंद 

ऑनलाईन टीम / पुणे :

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओव्हरहेड ग्रँटी बसविण्याच्या कामासाठी हा महामार्ग आज दुपारी 12 ते 2 या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.

या वेळेत पुण्याकडे येणारी वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविण्यात येणार आहे. गैरसोईबद्दल वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक विकास महामंडळाकडून द्रुतगती महामार्गावर पुण्याकडे येणाऱया मार्गिकेवर (किलोमीटर 82) येथे ओव्हरहेड ग्रँटी बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहने पर्यायी मार्गांवर वळविण्यात येतील. दुपारी 12 ते 2 या वेळेत मालवाहतूक करणारी अवजड वाहने द्रुतगती मार्गावरील खालापूर टोलनाका आणि कुसगाव टोलनाक्मयापूर्वी थांबविण्यात येणार आहेत. हलकी आणि चारचाकी प्रवासी वाहने द्रुतगती मार्गावरील कुसगाव टोलनाका येथून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून पुण्याकडे वळविण्यात येणार आहेत, असे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Related posts: