|Monday, December 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » आंतरराष्ट्रीय न्यायालयाची पाकला फटकार

आंतरराष्ट्रीय न्यायालयाची पाकला फटकार 

संयुक्त राष्ट्रसंघ :

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) संयुक्त राष्ट्रसंघ महासभेला स्वतःचा वार्षिक अहवाल सोपविला आहे. आयसीजेचे अध्यक्ष न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ यांनी महासभेच्या 74 व्या अधिवेशनादरम्यान कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी देण्यात आलेल्या निकालाची माहिती दिली आहे. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराच्या कलम 36 च्या अटींचे उल्लंघन केले आहे. या प्रकरणी योग्य पावले उचलली जाणे शिल्लक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

व्हिएन्ना कराराअंतर्गत दोन्ही देशांच्या कैद्यांना राजनयिक संपर्काचा अधिकार आहे. भारताने जाधव यांच्यासाठी अनेकदा राजनयिक संपर्काचे आवाहन केले होते. पण पाकने दाद दिली नव्हती. जाधव यांच्या प्रकरणी प्रभावी समीक्षा आणि पुनर्विचाराची गरज आहे. मानवाधिकारांच्या उल्लंघनामुळे पडलेल्या प्रभावांची पूर्ण चौकशी व्हावी असे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सुचविले आहे.

 

Related posts: