|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नाटय़ गीतांमधून उलघडला नाटय़ क्षेत्राचा प्रवास

नाटय़ गीतांमधून उलघडला नाटय़ क्षेत्राचा प्रवास 

बेळगाव / प्रतिनिधी

मराठी रंगभुमी वर्षानुवर्षे मराठी रसिकांचे मनोरंजन करीत आहे. या मराठी रंगभुमिवरील अजरामर अशी नाटय़गीते, भक्तीगीते अभंगांचा अनमोल नजराणा सोमवारी बेळगावकरांसमोर सादर करण्यात आला. रंगभुमी दिनाच्या पूर्व संध्येला हा बहारदार असा संगीत कार्यक्रम एक आपली वेगळी ओळख ठेवून गेला. गोव्याच्या गायकांनी आळविलेला सूर हा बेळगावकरांच्या मनामध्ये घर करून गेला.

रंगभूमी दिनानिमित्त वाङ्मय चर्चामंडळाच्या वतीने सोमवारी किर्लोस्कर रोड येथे मंडळाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पेडणे गोवा येथील ओंकार थिएटर्सच्या गायक वाद्य वृंदाने हा बहारदार कार्यक्रम सादर केला. मराठी रंगभुमीवरील अजरामर गीते सादर करून तो काळ पुन्हा उभा केला.

गणेश वंदनेने या कार्यक्रमाची सुरूवात झाली. दशरथ नाईक यांनी ओंकार अनादी अनंत ही गणेश वंदना सादर केली. सिद्धी मलिक हिने अबिर गुलाल हे भक्तीगीत सादर केले. पराग पार्सेकर यांने नारायणा रमारमणा पांडुरंग गावडे यांनी काटा रूते कुणाला ही गीते सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. संपदा देसाई हिने हे सुरांनो चंद्र व्हा हे गीत सादर केले. त्यांना राया कोरगावकर, रोहिदास परब, आदित्य तारी, सात्विक नाईक, गुरू पेडणेकर, राजू पवार यांची साथ मिळाली. प्रा. विजय परब यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

प्रारंभी वाङ्मय चर्चामंडळाचे कार्याध्यक्ष अशोक याळगी, ज्ये÷ स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव याळगी, माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कलघटगी ओंकार थिएटर्सचे संचालक डॉ. अमित सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. नीता कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आभार मानले. यावेळी संगीत क्षेत्रातील मान्यवर मंडळी श्रोते उपस्थित होते.

Related posts: