|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » Top News » बाबरी मशिदीखाली मोठी संरचना : सुप्रीम कोर्ट

बाबरी मशिदीखाली मोठी संरचना : सुप्रीम कोर्ट 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अयोध्येतील बाबरी मशिद ही रिकाम्या जागी बांधण्यात आली नसून, या मशिदीखाली मोठी संरचना होती, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वादप्रकरणातील अंतिम निकालाच्या वाचनाला सुप्रीम कोर्टात सुरुवात झाली आहे. बाबरी मशिदीखाली मोठी संरचना होती. त्यातील अवशेष व दगड हे इस्लामी पद्धतीशी नव्हे तर मंदिराशी साधर्म्य साधणारे होते, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

तसेच कोर्टाने सुन्नी वक्फ बोर्डाच्या विरोधातील शिया वक्फ बोर्डाचा दावा फेटाळला आहे. या खटल्यात रामलल्लाला पक्षकार मानण्यात आले असून, कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. निर्मोही आखाडय़ाचा दावाही कोर्टाने फेटाळला आहे. निर्मोही आखाडा सेवक नसल्याचेही कोर्टाने म्हटले आहे.

Related posts: