|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कोलगाव ओंकार भजन मंडळ प्रथम

कोलगाव ओंकार भजन मंडळ प्रथम 

माजगाव भजन स्पर्धा :  न्हावेली इसोटी, जयभवानी द्वतीय, तृतीय

प्रतिनिधी / सावंतवाडी:

माजगाव खालची आळी येथील सावंत-भोसले परिवार आणि मित्रमंडळाने आयोजित केलेल्या खुल्या भजन स्पर्धेत कोलगावच्या ओंकार प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. न्हावेली येथील श्री इसोटी पंचदेवी प्रासादिक भजन मंडळ आणि जय भवानी भजन मंडळाने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय
क्रमांक पटकावला. इन्सुलीच्या सावंत वस भजन मंडळाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

स्पर्धेचे उद्घाटन माजी सभापती अशोक दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच दिनेश सावंत, माजी सरपंच संदीप सावंत, आबा सावंत, संजय माजगावकर, रुद्राजी भालेकर, बापू सावंत, गावप्रमुख आर. के. सावंत, खेम सावंत, उमेश सावंत, एच. बी. सावंत, नरेश सावंत, रामदास सावंत, यशवंत सावंत, गुरुनाथ सावंत, सुरेश सावंत, किशोर सावंत, सुभाष सावंत, कमलाकर सावंत, दीपराज सावंत, अनिकेत सावंत, मंथन सावंत, प्रकाश सावंत, निखिल सूर्यवंशी, सूरज सावंत, मंगेश सावंत, विनोद सावंत उपस्थित होते.

उत्कृष्ट गायक सर्वेश राऊळ (ओंकार प्रासादिक भजना मंडळ, कोलगाव), उत्कृष्ट हार्मोनियम वादक संदेश कवठणकर (काजरोबा प्रासादिक भजन मंडळ, कवठणी), उत्कृष्ट तबला वादक कपिल धाऊसकर (इसोटी प्रा. भजन मंडळ, न्हावेली) उत्कृष्ट पखवाज तुकाराम सावंत (सावंत वस भजन मंडळ, इन्सुली), उत्कृष्ट झांज श्री. घरवडकर भजन मंडळ, माळीचे घर, मळगाव, उत्कृष्ट कोरस देव राष्ट्रोळी स्वरधारा प्रा. भजन मंडळ, आरोस. स्पर्धेचे परीक्षण शहाजान शेख (सावंतवाडी) आणि दया मेस्त्राr (चराठा) यांनी केले.

पारितोषिक वितरण परीक्षक शहाजान शेख आणि दया मेस्त्राr यांच्यासह सावंत भोसले परिवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन उमेश सावंत यांनी केले. तर आभार संदीप सावंत यांनी मानले.

Related posts: