|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा होणार वादळी

जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा होणार वादळी 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या वैयक्तीक लाभाच्या योजनांतून गेल्या अर्थिक वर्षात लाभार्थ्यांनी मंजूर साहित्य स्वखर्चातून खरेदी केली आहे. त्याचे अनुदान मिळवण्यासाठी त्यांनी सर्व कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केले आहे. पण अनेक लाभार्थी अद्यापही अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर जि.प.सदस्य तीव्र नाराज झाले असून बुधवारी (13 नोव्हेंबर) होणाऱया स्थायी समिती सभेत हा विषय गाजणार आहे.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून झेरॉक्स मशिन, सायकल, दळपकांडप यंत्र, पिको फॉल, शिलाई मशिन, लॅपटॉप आदी साहित्य लाभार्थ्यांना दिले जाते. नवीन कायद्यानुसार आता वस्तूंऐवजी लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा केले जात आहे. कृषी विभागाकडून गेल्या अर्थिक वर्षामध्ये मर्सिबल आणि सबमर्सिबल पंप (3 ते 7.5 एचपी), पाचशे फुट पाईप लाईन व ताडपदरी, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, पॉवर विडर, भात मळणी यंत्र, पेरणी यंत्र, मिनी राईस मिल, ट्रक्टर (20 ते 70 एच.पी), कडबाकुट्टी आदी साहित्यासाठी अनुदान मंजूर केले जाते. महिला व बालकल्याण विभागाकडून घरापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर शाळेला जाणाऱया मुलींसाठी सायकलींचा लाभ मिळणार आहे. तसेच ज्या मुली 10 वी व 12 वी नंतर एमएससीआयटी कोर्स करतात त्यांनी कोर्स उत्तीर्ण झाल्याच्या प्रमाणपत्रासह अर्ज सादर केल्यानंतर 3 हजार रूपये अनुदान दिले जाते. त्यानुसार लाभार्थ्यांनी संबंधित योजनांचे फॉर्म सर्व कागदपत्रांसहित संबंधित पंचायत समित्यांकडे पाठविल्यानंतर तेथून मागणी अर्जानुसार साहित्य खरेदी करण्यास मंजूरी दिली जाते. त्यामुळे गेल्या अर्थिक वर्षात लाभार्थ्यांनी मंजूर साहित्य आठ महिन्यांपूर्वीच खरेदी केले आहे. अनेक लाभार्थ्यांनी उसनवारी करून साहित्याची खरेदी केली आहे. मात्र तांत्रिक कारण पुढे करून संबंधित विभागांनी लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित ठेवले आहे.

दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आणि जि.प.तील कर्मचाऱयांची निवडणूक कामकाजासाठी निवड केल्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यास विलंब झाल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. पण यामध्ये लाभार्थ्यांची मात्र मोठी अर्थिक कुचंबना झाली आहे. याबाबत  लाभार्थ्यांनी जि.प.सदस्यांची भेट घेऊन आपली गाऱहाणे मांडली आहेत. त्यामुळे बुधवारी होणाऱया स्थायी समिती सभेमध्ये सर्व सदस्य कृषी, महिला-बालकल्याण, समाजकल्याण विभागाच्या कारभाराबाबत आक्रमक होण्याची शक्यता आहे 

 

 

Related posts: