|Thursday, December 12, 2019
You are here: Home » Top News » औरंगाबादमध्ये डेंग्यूचा फैलाव

औरंगाबादमध्ये डेंग्यूचा फैलाव 

औरंगाबाद / प्रतिनिधी : 

औरंगाबाद शहरात डेंग्युमुळे 11 जणांचा मृत्यू झाला असताना आता डेंग्यूचा जिल्हय़ातही फैलाव झाला आहे. जिल्हय़ातील 9 तालुक्यांमध्ये तब्बल 52 रुग्णांना डेंग्यू झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी दिली.

यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला. असे असले, तरी अनेक गावांमध्ये मात्र धास्तीचे वातावरण आहे. औरंगाबाद शहरासह जिल्हाभरात डेंग्यूची लागण झाली आहे.

ग्रामीण भागात लागण झालेल्या डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य अधिकाऱयांसह साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एन. बारडकर यांच्या नेतृत्वात प्रयत्न करण्यात येत आहेत.

Related posts: