|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मद्यधुंद कारचालकाने धुमस्टाईल चालवून दोन दुचाकीवरील चौघाना ठोकरले,

मद्यधुंद कारचालकाने धुमस्टाईल चालवून दोन दुचाकीवरील चौघाना ठोकरले, 

प्रतिनिधी/ म्हसवड

वेळ रात्रीच्या आठची सर्व पोलिस कर्मचारी आप आपल्या कामात असताना ठाण्यात फोन खणानला पिलीव येथून आठ जनांना ठोकरुन एक चार चाकी म्हसवडच्या दिशेने येत आहे तीला थांबवा म्हणताच म्हसवड पोलिसांची पळापळ सुरु झाली आणि पंढरपुर रोडवर माळशिरस चौकात बॅरिकेट धावले व बंदोबस्त लावला आरोग्य केंद्रा नजिक ही पोलिस त्या गाडीची वाट पहात असताना माळशिरस चौकातील बॅरिकेट उडवून सु साठ वेगाने आरोग्य केंद्रा जवळ उभा असलेल्या पोलिसानी चार चाकी थांबवण्याचा प्रयत्न वाया गेले व भरधाव जिप व पोलिसाचा पाठलाग पंधरा किलो मिटर सुरु होता मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशिल पाटिल व त्यांच्या कार्यकर्त्यानी पंढरपुर रोडवर डंपर रस्त्यावर उभा करुन ती चार चाकी थांबवली व गाडीतुन बेधुंद दारु पिलेल्या ड्रायव्हरला नागरीकांनी चोप देते म्हसवड पोलिसांच्या ताब्यात दिले    

        याबाबत म्हसवड पोलीस व नागरीकांकडुन समजलेली अधिक माहिती अशी  उपरी ता.पंढरपुर (जि सोलापूर) पासून म्हसवड हद्दी पर्यत सुरू आसलेला थर थराट सिनेमास्टाईल चोर पोलिसाचा पाठलाग मनसेचे जिल्हाध्यक्ष यांच्या धाडसाने  पुढे होणारा  अनर्थ टळला.या थरारात चालक हणमंत गेजगे यांने प्रथम सुळेवाडी पिलीव येथे जगदाळे व फडतरे यांच्या मोटार सायकलला ठोकर देवून जख्मी केले तर पिलीव येथे हि रोहण सातपुते यांच्या गाडीला ठोकरत भरधाव वेगाने म्हसवडकड आलेल्या त्या सुसाट चार चाकी ने माळशिरस चौकातील  बॅरिकेत उठवत आरोग्य केंद्राच्या पुला जवळ दशरथ खांडेकर खांडेकर वस्ती म्हसवड व तातोबा लोखंडे विरकरवाडी यांच्या मोटार सायकलला धड़क दिली या धडकेत खांडेकर यांच्या पायाला तर लोखंडे यांच्या सातारा व डोक्याला मार लागला तरी हि गाड़ी न थांबता  गोंदवल्याच्या दिशेने पोलिसांनी पाठलाग सुरु करत गोंदावले येथील धैर्यशिल पाटिल मानना या घटनेची माहिती दिली व डंपर आडवा लावून ती सुसाट चार चाकीला आडवा असे  मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्यासह भास्कर कट्टे यांच्याशी म्हसवडच्या शेखर वीरकर यांनी संपर्क साधून एक चारचाकी वाहन रस्त्याने वाहनांना ठोकरत येत असल्याबाबतची माहिती दिली.यावेळी गोंदवल्यातील नागरिकांमध्ये ही बातमी समजताच भरधाव वेगाने अपघात करत निघालेल्या वाहनाला अडविण्यासाठीची धावपळ सुरू झाली.अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण रस्ता रिकामा करण्यात आला.हे अपघाताला कारणीभूत असणारे वाहन थांबविण्यासाठी सातारा पंढरपूर या मुख्य रस्त्यावरच धैर्यशील पाटील यांनी स्वतःचा डंपर आडवा उभा केला.काही मिनिटातच एम एच 11 सी जी 3660 ही पांढया रंगाची चारचाकी वेगाने येताना दिसली.त्याचक्षणी तातडीने ही गाडी थांबविण्यासाठी लोकांची धावपळ सुरू झाली.रस्त्यावरच डंपर आडवा लावल्यामुळे मद्यपी चालकाला गाडी थांबविण्याशिवाय पर्यायच नव्हता.त्यामुळे चालक गेजगे याने गाडी थांबविताच लोकांनी गाडीभोवती गराडा घातला.परंतु गाडीची दारे व काचा बंद असल्याने व वाहन सुरूच असल्याने धोका अधिकच वाढला होता.मात्र याचवेळी मोठय़ा धाडसाने धैर्यशील पाटील यांनी गाडीच्या वर उभे राहून चालकाला गाडी बंद करण्यास सांगितले.परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर काचा फोडून गाडी बंद करण्यात आली.चालक हणमंत गेजगे यालाही गाडीतून बाहेर काढून लोकांनी चांगलाच चोप दिला.याचवेळी या थरारक वाहनाचा पाठलाग करणारे पोलीस देखील घटनास्थळी पोचले.लोकांनी या चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले.

          दरम्यान या वाहनाने विरकरवाडी(ता.माण)येथील दोघांना पिलीव घाट परिसरात उडवून गंभीर जखमी केले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असली तरी संपूर्ण प्रवासादरम्यान आणखी किती जणांना अपघातग्रस्त केले आहे याबाबत मात्र अद्याप माहिती मिळालेली नव्हती.म्हसवड पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन व चालकला ताब्यात घेतले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे अधिक तपास करीत आहेत.या थरारक पाठलागात म्हसवड पोलीस ठाण्याचे किरण चव्हाण,सुरज काकडे,संजय अस्वले,अनिल वाघमोडे सहभागी झाली होते.गोंदवल्यात या थरारक वाहनाबाबत माहिती समजताच लोकांनी मोठी गर्दी केली होती.

 

Related posts: