|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अनफ खुर्द येथे शॉर्टसर्किटने घरास आग

अनफ खुर्द येथे शॉर्टसर्किटने घरास आग 

वार्ताहर / पाटगांव

भुदरगड तालुक्यातील अनफ खुर्द येथे एका घर आगीत भस्मसात झाले. शुक्रवारी पहाटे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत येथील रहिवासी यास्मीन अजिज माणगावकर यांच्या राहत्या घरचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली असली, तरी  या आगीत पन्नास हजार रोकड व प्रापंचिक वस्तू जळून खाक झाल्या आहेत.  ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला

आगीमध्ये घरातील पन्नास हजारांची रोख रक्कम, गोदरेज कपाट, एक लाकडी कपाट, एक बेड, एक दिवान, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, सिलिंग फॅन, दोन टेबल फॅन, तसेच मुलगीच्या लग्नासाठी खरेदी केलेली सर्व कपडे, त्या सोबत शालेय साहीत्य व घरातील महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. संपूर्ण, फिटिंग, व खिडक्याची तावदाने फुटून गेली आहेत, असे एकूण सुमारे एक लाखाचे नुकसान झाले आहे. गाव कामगार तलाठी प्रकाश खाडे पोलीस पाटील रवींद्र सूर्यवंशी यानी पंचनामा केला असून शासनाकडून याबाबत लवकरच दखल घेऊन या कुटुंबाला तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी परिसरातील जनतेची मागणी आहे.

Related posts: