|Saturday, February 29, 2020
You are here: Home » क्रिडा » क्लब वर्ल्डकपमध्ये लिव्हरपूल अजिंक्य

क्लब वर्ल्डकपमध्ये लिव्हरपूल अजिंक्य 

2008 नंतर चषक जिंकणारा केवळ दुसराच संघ, जादा वेळेत रॉबर्टो फर्मिंगोचा गोल निर्णायक

दोहा / वृत्तसंस्था

रॉबर्टो फर्मिन्होने जादा वेळेत निर्णायक गोल केल्यानंतर लिव्हरपूलने क्लब वर्ल्डकप जेतेपदावर थाटात आपले नाव कोरले. ब्राझीलच्या फ्लॅमेन्गोला त्यांनी 1-0 अशा निसटत्या फरकाने मात दिली. 2008 मध्ये मँचेस्टर युनायटेडनंतर लिव्हरपूल हा क्लब वर्ल्डकप जिंकणारा दुसरा इंग्लिश संघ ठरला. दोहातील खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ही लढत खेळवली गेली.

लिव्हरपूलने क्लब वर्ल्डकप जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. फर्मिन्होने जादा वेळेत नवव्या मिनिटाला निर्णायक गोल केल्यानंतर लिव्हरपूलचे सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित झाले. लिव्हरपूलचा डच डिफेंडर व्हर्जिल व्हान डिकने पुनरागमनाच्या लढतीत अतिशय उत्तम योगदान दिले. निर्धारित वेळेतील लढतीत दोनही संघांनी गोल नोंदवण्याच्या काही संधी निष्फळ घालवल्या. त्यानंतर जादा वेळेत लिव्हरपूलच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

Related posts: