|Monday, February 17, 2020
You are here: Home » उद्योग » केंद्र सरकार देणार हुआवेला ट्रायल स्पेक्ट्रम

केंद्र सरकार देणार हुआवेला ट्रायल स्पेक्ट्रम 

अमेरिकेकडून होणाऱया दबावामुळे निर्णय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दूरसंचार कंपन्या आणि उपकरण विक्रेत्यांची मंगळवारी देशात 5 जी चाचण्यांसाठी रोडमॅपवरील चर्चेबाबत दूरसंचार विभागाच्या (डिओटी) संबंधीत अधिकाऱयांसोबत बैठक झाली. दूरसंचार सचिव अंशू प्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, रिलायन्स जिओ आणि हुआवेसह सर्व उपकरण विक्रेत्यांच्या वरिष्ठ प्रतिनिधींनी या बैठकीत सहभाग घेतला होता. या बैठकीत व्यापक रोडमॅपवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, चीनच्या हुआवे टेक्नॉलॉजीज लिमिटेडसह सर्व अर्जदार कंपन्यांना 5 जी चाचण्यांसाठी सहभागी होण्याची परवानगी दिल्याचे दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले होते.

हुआवेसाठी मदत म्हणून हा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेमध्ये  या कंपनीची चौकशी सुरू आहे. हुआवेच्या 5 जी उपकरणांचा वापर करून चीन दुसऱया देशांची हेरगिरी करू शकतो, असा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे.

दूरसंचार विभाग परवानाधारकांना ट्रायल स्पेक्ट्रमचे वाटप करणार आहे. यात रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, नोकिया, हुआवे, इरिक्सन आणि सॅमसंग यांचा यात समावेश आहे. दरम्यान, हुआवेने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Related posts: