|Monday, January 27, 2020
You are here: Home » Top News » शाळेच्या सचिवाची मुख्याध्यापकास जीवे मारण्याची धमकी देत मारहाण

शाळेच्या सचिवाची मुख्याध्यापकास जीवे मारण्याची धमकी देत मारहाण 

कागल/प्रतिनिधी

शाळेतील शिक्षकांनी दोन पगार आम्हाला न देता परस्पर बँकेतून का काढले. याचा राग धरून बेलवळे खुर्द येथील शाळेच्या मुख्याध्यापकास शाळेच्या सचिवांनी ठार मारण्याची धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक संतोष राजाराम पाटील (रा. बेलवळे बुद्रुक) यांनी तीन जणांविरोधात कागल पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी शाळेचे सचिव दिनकर श्रीपती कोतेकर, अभिजित दिनकर कोतेकर, अमोल दिनकर कोतेकर (सर्व रा. बेलवळे खुर्द) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुख्याध्यापक पाटील हे बेलवळे खुर्द येथील एका शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करतात. दिनकर कोतेकर हे या शाळेचे सचिव आहेत. त्यांनी मुख्याध्यापक पाटील यांना आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास आपल्या घरी बोलावून घेतले. पाटील यांच्यासह शाळेचा शिपाई व सहाय्यक शिक्षक असे मिळून दिनकर कोतेकर यांच्या घरासमोर गेले असता दिनकर, अभिजित आणि अमोल कोतेकर यांनी शिक्षकांनी दोन दोन पगार आम्हाला न देता परस्पर बँकेतून काढले आहेत. याचा राग मनात धरून तिघांनी फिर्यादी संतोष पाटील यांना तीन तास थांबवून ठेवून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर तुला जिवंत ठेवत नाही तुला ठार मारतो अशी धमकी दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी तीन जणांविरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी तिघा जणांच्या वर गुन्हा दाखल केला आहे.

Related posts: