|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » बँक कर्मचारी पुन्हा संपावर

बँक कर्मचारी पुन्हा संपावर 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

बँक कर्मचारी पुन्हा एकदा संप पुकारला आहे. या संपामुळे शुक्रवार ते रविवार (31 जानेवारी व 1,2  फेब्रुवारी ) असे तीन दिवस बँकांचा कामकाज चालणार नाही. बँक कर्मचाऱयांनी प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता बँकांची कामं शुक्रवारच्या आधी लवकरात लवकर उरकावी लागणार आहेत.

इंडियन बँक असोसिएशन’ सोबत वेतन करार आणि इतर मागण्यांसंदर्भात झालेली चर्चा फिस्कटल्यामुळे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (बँक कर्मचारी संघटना) दोन दिवसीय संपाची हाक दिली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण आणि एकत्रीकरणाला बँक कमर्चाऱयांनी विरोध केलेला आहे.

दरम्यान, 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्या दिवशी बँक कर्मचारी संपावर असल्याने बँका बंद राहणार आहेत.

 

 

 

Related posts: