आपलेपणाची जाणी करविते ही कृती
अमेरिकेत अध्यक्ष बिडेन यांना लोक बाइडो म्हणत असतील ही कल्पना करणे कठिण आहे. तसेच जो बिडेन हे स्वत:साठी बाइडो हे टोपणनाव निवडतील ही कल्पना करणे तर त्याहून कठिण आहे. परंतु ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज आणि माजी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना अनुक्रमे अल्बो अन् स्कोमो या टोपणनावाने हाक मारली जाते. याचबरोबर हे दोन्ही नेते स्वत:करता टोपणनावाच्या वापरालाच अधिक भर देतात. हा प्रकार केवळ राजकीय नेते नव्हे तर ऑस्ट्रेलियत समाजातही अत्यंत दृढ आहे.
टोपणनाव अनौपचारिकता अन् जवळिकीची जाणीव करून देत असल्याचे कॅनबरा येथील ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीतील भाषातज्ञ इवान किड यांनी म्हटले आहे. टोपणनावांमुळे लोकांदरम्यान आपलेपणाची जाणीव होते. ऑस्ट्रेलियात समाजात वर्गभेद करण्याचा इतिहास नाही. याचमुळे नावापूर्वी पदाचा वापर फारच कमी प्रमाणात केला जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या लोकांना पंतप्रधान मॉरिसन असा उल्लेख ऐकण औपचारिक अन् विचित्र वाटत असावा. तेथे श्रीयुत किंवा श्रीमती किंवा डॉक्टर असा उल्लेख एकप्रकारचे सामाजिक अंतर निर्माण करते. टोपणनावाने हाक मारण्यापेक्षा हा प्रकार अत्यंत वेगळा असल्याचे किड यांचे सांगणे आहे.
टोपणनावाला नेते अधिक पसंत करतात, कारण यामुळे आपण मैत्रिपूर्ण असून आपल्यापर्यंत पोहोचणे सोपे असल्याचे दाखवून देता येते. पंतप्रधान अल्बनीज यांच्या राजकीय कारकीर्दीच्या प्रारंभापासून एल्बो हे टोपणनाव राहिले आहे. तर माजी पंतप्रधान मॉरिसन यांनी स्वत:साठी स्कोमो हे टोपणनाव निवडले.
मॉरिसन यांना स्वत:च्या कारकीर्दीच्या प्रारंभी स्कोमो या टोपणनावामुळे मोठी मदत मिळाली. हा प्रकार त्यांच्यासाठी उपयुक्त ठरला. टोपणनाव ऑस्ट्रेलियाच्या लोकांना एका समान स्तरावर आणत असल्याचे जॉन कर्टिन रिसर्च सेंटरमधील तज्ञ निक डायरेनफर्थ यांचे सांगणे आहे.