Nirwade Satam Maharaj’s death anniversary
निरवडे झरबाजार येथे साटम महाराज कला क्रिडा सेवा मंडळातर्फे गुरुवार ९ ते ११ मार्च रोजी साटम महाराजांच्या ८६ व्या पुणियतिथीनिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .९ मार्चला सकाळी ८ वाजता मूर्तिपूजन व पादूका पूजन, १२ वाजता आरती , १२.३० वाजता तीर्थप्रसाद , १.३० वाजता महाप्रसाद , सायंकाळी ६ वाजता हरिपाठ व आरती , सायंकाळी ७ वाजता बुवा सुंदर मेस्री ( कसाल ) , बुवा चिन्मय सावंत ( कणकवली ) या भजनी बुवांचा जुगलबंदी कार्यक्रम , १० मार्चला सायंकाळी ६ वाजता हरिपाठ व आरती , रात्री ८ वाजता ( सिंधुदुर्ग गोवा राज्य ) खुली रेकॅार्ड डान्स स्पर्धा प्रथम पारितोषिक ७०२३ रुपये व चषक , व्दितीय पारितोषिक ५०२३ रुपये व चषक ११ मार्चला सायंकाळी ४ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम , सायंकाळी ६ वाजता हरिपाठ व आरती , रात्री ८ वाजता लिलाव , रात्री ९ वाजता संयुक्त दशावतार नाट्यमंडळ यांचा ‘ वीर बब्रुवाहन हा नाट्यप्रयोग होणार आहे .
न्हावेली / वार्ताहर