मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याशी सकारात्मक चर्चा
प्रतिनिधी/ सातारा
सातारा नगरपालिकेच्या कामगार युनियनच्या शिष्टमंडळासोबत मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी बैठक घेऊन विविध मुद्यावर चर्चा केली. कामगारांचे प्रश्न कामगार नेते माजी नगराध्यक्ष निशांत पाटील यांनी मुख्याधिकाऱयांकडे मांडले. मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सकारात्मक चर्चा केली.
या बैठकीत कामगारांच्यावतीने चतुर्थश्रेणी कर्मचाऱयांच्या वारसा हक्काच्या, अनुकंपाच्या जागा त्वरित भराव्यात, मुख्याधिकारी साहेबांना 30 दिवसांच्या आत लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काच्या जागा भरण्याचा अधिकार मुख्याधिकाऱयांना आहे. त्या जागा भरल्या जात नाहीत. दरमहा 1 तारखेला पगार व पेन्शन झाली पाहिजे तसेच दि. 7 तारखेच्या आत पगार कपाती झाल्या पाहिजेत. त्यासाठी तरतूद ठेवण्यात आली पाहिजे. दर वेळेस पगार व पेन्शन वेळेत होत नाही. शासनाकडील ग्रॅण्डवर अवलंबून न राहता दरमहा येणाऱया ग्रॅण्डमधून थोडी थोडी रक्कम रिझर्व्ह फंडात टाकून दरमहा पगार 7 तारखेला करावा, कर्मचाऱयांचा सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता त्वरित प्रॉव्हिडंट फंडात जमा करण्यात यावा, सचिन साठे प्रकरणाबाबत नियमात बसत नसताना देखील त्याला नोकरीत सामावून घेण्याबाबतच्या वारसाच्या यादीत चुकीची कागदपत्रे दाखल करुन नाव समाविष्ट करणाऱया अधिकाऱयांवर कारवाई करण्यात यावी, एखादा सफाई कामगार मयत अथवा सेवानिवृत्त झाल्यास त्यांच्या वारसाने 1 वर्षाच्या कालावधीत पालिकेकडे अर्ज करणे अपेक्षित असते. परंतु साठे प्रकरणात त्या वारसाने 2022 मध्ये अर्ज केलेला आहे. तसेच यामध्ये आणखी दोन ते तीन जणांनी नोकरी मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे. या प्रकरणात अवकिरकर नामक कोर्टात गेला आहे. सफाई कामगाराच्या वारसाने त्याच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप असून त्याबाबत पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल आहे. 2014 ला तो कामगार मृत असून साठे यांनी नोकरी मिळण्यासाठी 2022 मध्ये अर्ज केल्याने हे प्रकरण प्रलंबित ठेवावे, आदी विविध मुद्यावर चर्चा करण्यात आली.