तारा हडफडकर यांना उपसरपंच पदाची संधी मिळण्याची शक्मयता
प्रतिनिधी /पेडणे
मांदे पंचायतीच्या उपसरपंच चेतना पेडणेकर यांच्याविरोधातही दाखल झालेला अविश्वास ठराव सोमवार दि.19 रोजी मंजूर करण्यात आला. आता नव्या उपसरपंच म्हणून तारा हडफडकर यांची निवड निश्चित असल्याचे माहिती मिळाली आहे.
अविश्वास ठरावरावर चर्चा करण्य़ासाठी आयोqिजत केलेल्या बैठकीला पंचायत मंडळातील उपसरपंच चेतना पेडणेकर, माजी सरपंच महेश कोनाडकर, राजेश मांजरेकर आणि संपदा आसगावकर हे चार पंचसदस्य गैरहजर राहिले. त्यामुळे सात विरुद्ध चार मतांनी ठराव मंजूर झाला. सरपंच अमित सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष बैठक पंचायत कार्यालयात झाली. चर्चेदरम्यान चार पंच सदस्य गैरहजर राहिल्यामुळे सात विरुद्ध चार असा होती. ठराव मंजूर झाल्याची माहिती सरपंच अमित सावंत यांनी दिली.
यावेळी तारा हडफडकर प्रशांत नाईक, मैथिली फर्नाडिस, रॉबर्ट फर्नाडिस, मिंगल फर्नाडिस, किरण सावंत आदी उपस्थित होते
मांदे पंचायतीचे सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर निवडीनंतर 24 तासांच्या आत विरोधात अविश्वास ठराव आणून तो मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे मांदेची पंचायत चार्चेत आली. सोपटे गटाला शह देण्यासाठी आमदार जीत आरोलकर यांनी ही खेळी केली होती.
त्यानंतर आमदार जीत आरोलकर यांच्यासोबत सात पंच सदस्यांनी रेडी येथील स्वयंभू गणपती मंदिरात जाऊन शपथ घेतली होती. त्यानुसार अमित सावंत यांची सरपंचपदी निवड झाली.