पालिका मुख्याधिकाऱयांनी केली गाळय़ांची पाहणी. तत्काळ गाळे हटविण्यासाठी प्रक्रिया हाती घेण्याचे आदेश. बेकायदेशीर सामान ठेवल्याप्रकरणी चौकशी करणार. पालिकेतील अधिकारी गुंतले असल्यास कारवाई.
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली बाजारातील तात्पुरत्या पत्र्यांच्या गाळय़ांमध्ये बेकायदेशीररीत्या भाजी विपेत्यांनी आपले सामान ठेवल्याच्या प्रकाराची गंभीर दखल डिचोली नगरपालिका मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांनी घेतली असून काल सोम. दि. 19 सप्टें. रोजी त्यांनी स्वतः संबंधित अधिकाऱयांना बरोबर घेऊन पाहणी केली. या पाहणीत सदर गाळय़ांमध्ये असलेल्या सामानाचीही पाहणी करत हे तात्पुरते गाळे तत्काळ जमिनदोस्त करण्यासाठी सोपस्कार हाती घेण्याची सुचना मुख्याधिकाऱयांनी पालिका कनि÷ अभियंता व इतरांना दिली आहे.
डिचोली बाजारातील नवीन मार्केट प्रकल्पाच्या बांधकामावेळी त्याठिकाणी असलेल्या 24 गाळय़ांचे स्थलांतर या तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या पत्र्यांच्या गाळय़ांमध्ये केले होते. गेल्या वर्षभरापूर्वी या नवीन मार्केट प्रकल्प इमारतीचे काम पूर्ण होऊन तो प्रकल्प मार्गी लागला आहे. त्यात आज 18 गाळय़ांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर 6 गाळय़ांचे स्थलांतर काही कारणास्तव प्रलंबित राहिले आहे. परंतु या गाळय़ांमध्ये आठवडा बाजारासाठी येणाऱया भाजी विपेत्यांकडून आपले सामान या गाळय़ांमध्ये बेकायदेशीरपणे ठेवल्याचै आढळून आले होते.
नगराध्यक्षांनी ठोकले होते गाळय़ांना टाळे
गेल्या गुरूवारी (दि. 15 सप्टें.) बाजारात निर्माण झालेल्या कचरा समस्येमुळे कचऱयाची साफसफाई करून घेत असताना नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या निदर्शनास सदर प्रकार आला होता. त्यामुळे नगराध्यक्षांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यांनी थेट सदर गाळय़ांना टखळेच ठोकले होते. काही गाळय़ांना तर भाजीवाल्यांनी आपली कुलूपे लावली असल्याचे निदर्शनास आले होते.
मुख्याधिकाऱयांनी केली पाहणी व गाळे हटविण्यासाठी सोपस्कार करण्याचे दिले आदेश
या विषयाची बातमी दै. तरूण भारतमध्ये ठळकपणे झळकल्यानंतर डिचोली शहरात या विषयाची चर्चा बरीच रंगली होती. या पालिकेच्या दुर्लक्षितपणावर लोकांनी ताशेरे ओढले होते. बाजारात पालिकेचे जबाबदारी अधिकारी निरिक्षक काय करत आहेत ? असा सवालही उपस्थित करण्यात आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत डिचोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांनी काल सोम. दि. 19 रोजी सकाळी या गाळय़ांची पाहणी केली. यावेळी पालिका कनि÷ अभियंता, बाजार निरिक्षक, कर अधिक्षक व इतरांची उपस्थिती होती. गाळय़ांची व आतील सामानाची पाहणी केल्यानंतर हे गाळे तत्काळ जमिनदोस्त करण्यासाठी आवश्यक ते सोपस्कार हाती घेण्याचे आदेश मुख्याधिकाऱयांनी संबंधितांना केले.
परस्परपणे या प्रकरात कोणी गुंतले असल्यास थेट कारवाई करणार – मुख्याधिकारी
डिचोली नगरपालिकेच्या या मालमत्तेत थेट सामान ठेऊन त्या गाळय़ांना कुलूप लावण्याचे धाडस कोणी भाजी विपेते करूच शकत नाही. या भाजी विपेत्यांना पालिकेतील किंवा पालिकेबाहेरील कोणाचातरी अभय असल्याशिवाय या गाळय़ांचा सामान ठेवण्यासाठी सर्रासपणे उपयोग होऊच शकत नाही. या विषयी मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांना विचारले असता, या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश आपण दिले आहे. या प्रकारात जर कोणी पालिकेतील अधिकारी किंवा निरिक्षक गुंतले असल्यास त्यांच्यावरही कारवाई करणार. बाजारात घडत असलेल्या बेकायदेशीर बाबींवर पालिका निरिक्षकांनी लक्ष ठेवायचे असते, ते या कामात फोल ठरल्याचे निदर्शनास आल्यास त्याकडे गांभीर्याने लक्ष देत कारवाई केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
मुख्याधिकाऱयांची कृती स्वागतार्ह, या प्रकरणात कोण गुंतले आहेत त्याची चौकशी करावी – नगराध्यक्ष
बाजारातील सदर तात्पुरती पत्र्यांचे गाळे हटविण्यात यावे असा ठराव पालिका मंडळच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्या ठरावाची इतके दिवस अंमलबजावणी झाली असती तर आज हा प्रकार घडलच नसता. तरीही या प्रकारानंतर मुख्याधिकाऱयांनी स्वतः या गाळय़ांची पाहणी करत ते तत्काळ जमिनदोस्त करण्यासाठी सोपस्कार हाती घेण्याचे दिलेले आदेश हि कृती स्वागतार्ह आहे. या सोपस्काराप्रमाणेच या गाळय़ांमध्ये सामान कोणी ठेवण्यास भाजी विपेत्यांना अभय दिला ? तसेच सदर भाजी विपेते कोण ? कोणाच्या सांगण्यावरून सदर भाजी विपेत्यांनी सामान तेथे ठेऊन कुलूपे मारली ? या सर्वा गोष्टींचीही मुख्याधिकाऱयांनी चौकशी करावी. अशी मागणी नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी केली आहे.