ऑनलाईन टीम / तरुण भारत :
खा. संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. राहुल तळेकर (वय 23) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी शनिवारी सकाळी आमदार सुनील राऊत यांनी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवली. त्यानंतर पुणे पोलिसांनी संबंधित संशयित आरोपी तळेकर याला अटक केली. त्याच्यावर 504 (506 )2 गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरोपी राहुल मुळचा जालना येथील रहिवासी आहे. तो पुण्यात हॉटेल चालवतो. 31 मार्चला तो संजय राउत यांना फोन करत होता. मात्र, फोन संजय राऊत यांनी त्याचा फोन उचलला नाही. त्यानंतर राहुलने दारूच्या नशेत त्यांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावे त्यांना धमकीचा मेसेज केला होता. तपासादरम्यान, त्याची कोणतीही राजकीय किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आलेली नाही. मुंबई पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.
अधिक वाचा : भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे निधन