108 एमपी कॅमेरा, 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
वनप्लस हा स्मार्टफोन भारतीय बाजारात 4 एप्रिल रोजी सादर करण्यात येणार आहे. यामध्ये कंपनी वनप्लस नॉर्ड सीइ 3 लाइट हा 5 जी मधील देशातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन म्हणून सादर करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या स्मार्टफोन संदर्भातील अधिकची माहिती कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर दिलेली आहे. कंपनीच्या मतानुसार सदरचा स्मार्टफोन अँड्रॉइड 619 जीपीयू, 8जीबी रॅम आणि स्नॅपड्रॉगन 695 5- जी प्रोसेसरसह उपलब्ध होणार आहे. ज्यामध्ये 8 जीबी पर्यंत रॅम वाढविण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. सदरचा स्मार्टफोन हा पॅमेऱ्याच्याबाबतीत अव्वल असल्याचे सांगितले जाते. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये बॅक पॅनलमध्ये 3 एक्स लॉसलेस झूमसह तब्बल जवळपास 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये राहणार आहे.