नवी दिल्ली / वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील ठाणे शहरात एका महिलेला 10 लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. विदेशी चलन व्यवहारांमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष या महिलेला दाखविण्यात आले होते. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींच्या आधारावर या प्रकरणी एफआयआर नोंद केला आहे.
आरोपीने या महिलेला विदेशी चलनाच्या ऑनलाईन व्यापाराची भुरळ पाडली होती. या व्यवहारांमध्ये बख्खळ लाभ आहे, असा विश्वासही दिला होता. त्यामुळे या महिलेने 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली. तथापि, तिला कोणताही लाभ तर झाला नाहीच, शिवाय तिची सर्व रक्कम हडप करण्यात आली. त्यानंतर तिने सायबर पोलिसांमध्ये या घटनेची रीतसर तक्रार नोंदविली आहे.