सेन्सेक्स 293 अंकांनी प्रभावीत ः एफएमसीजीचे समभाग नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारातील शुक्रवारच्या अंतिम सत्रात व वर्ष 2022 मधील अखेरच्या दिवशी बाजार घसरणीसोबत बंद झाला आहे. यामध्ये सेन्सेक्स 293 अंकांनी प्रभावीत होत बंद झाला आहे. आता आगामी नव्या वर्षात बाजाराची दिशा कशी असेल हे पाहणे आवश्यक असणार आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 293.14 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 60,840.74 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 85.70 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 18,105.30 वर बंद झाला आहे. दिवसभरातील कामगिरीत सेन्सेक्समधील 30 मधील 18 समभाग हे घसरणीत राहिलेले पाहायला मिळाले तर 12 समभागात मात्र तेजी दिसून आली.
मुख्य कंपन्यांमध्ये आयशर मोर्ट्स, ग्रासिम, आयसीआयसीआय बँक, दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेल, एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी आयटीसी आणि एचडीएफसीसह निफ्टीमधील 50 मधील 29 समभागांमध्ये घसरणीची नेंद केली आहे. दुसरीकडे बजाज फिनसर्व्ह, बजाज ऑटो, टायटन, ओएनजीसी, कोल इंडिया, बीपीसीएल, अदानी एंटरप्राईजेस व बजाज फायनान्ससह 21 समभाग तेजीत राहिले आहेत.
राष्ट्रीय शेअर बाजारातील 11 क्षेत्राच्या निर्देशांकापैकी 7 निर्देशांकांमध्ये घसरण अनुभवायला मिळाली. तर एफएमसीजी क्षेत्र हे सर्वाधिक प्रभावीत झालेले पाहायला मिळाले. यासह बँक, वाहन, आयटी, औषध आणि खासगी बँकांचे क्षेत्र घसरणीमध्ये राहिले आहे.
2022 मध्ये बाजाराचा प्रवास
शेअर बाजाराने वर्ष 2022 मध्ये जागतिक बाजाराच्या तुलनेत खुप चांगली कामगिरी केली आहे. तसेच काही जागतिक विपरीत परिस्थितीमध्ये सेन्सेक्स व निफ्टी 2 टक्क्यांपेक्षा अधिकने प्रभावीत राहिले होते, हेही दिसून आले. भारतीय बाजाराने चालू वर्षात नवीन उंची प्राप्त केली असल्याचीही नोंद आहे.
यामध्ये वाढलेले व्याजदर, चलनांमधील चढउतार व एफआयआयमधील विक्रीचा प्रभाव यामध्ये 1 डिसेंबर 2022 मध्ये सेन्सेक्स 63,583.07 व निफ्टी 18,887.60 च्या उच्चांकावर राहिल्याचे मोतीलाल ओसवाल यांच्या अहवालात म्हटले आहे.