न्हावेली/ वार्ताहर
Open district level rope competition organized at Vetye on 23rd!
श्री कलेश्वर युवा कला क्रिडा मंडळ, वरची गावकरवाडी वेत्ये येथे कै . गंगाराम निगुडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ खुल्या जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन रविवार सायंकाळी ७ वाजता करण्यात आले आहे. ही स्पर्धा ६०० किलो वजनी गटात होणार आहे या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ११,१११ व चषक , व्दितीय ५,१११ व चषक तसेच बेस्ट फ्रेंटमॅन १,१११ बेस्ट लास्टमॅन १,१११ अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे या स्पर्धेसाठी ६०० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे .