सागर नाणोसकर यांचा पुढाकार
सावंतवाडी प्रतिनिधी
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधुन काल ग्रामपंचायत सदस्य सागर नाणोसकर यांच्या पुढाकाराने उपकेंद्र तिरोडा यांच्या सहकार्याने नाणोस वॉर्ड नं १ मध्ये आयुष्यमान कार्ड तसेच रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाणोस गावातील तसेच तिरोडा, गुळदुवे गावातील बहुसंख्य नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी उपसरपंच सौ. अमिता नाणोसकर, ग्रामपंचायत सदस्या सौ कल्पना नाणोसकर, उपकेंद्र श्री राणे सर, आरोग्य सेविका कु सिद्धी शेट्ये, सौ. जोत्स्ना नवार, सौ. गवाणकर, कु करगुटकर, आशासेविका सौ. उर्मिला तळकर, बचतगट सौ नम्रता नाणोसकर, अंगणवाडीच्या सौ रजनि पायनाईक, सौ. संगिता नाणोसकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.