आचरा प्रतिनिधी
आचरा येथील इनामदार श्री रामेश्वर संस्थानच्या गणेशोत्सवा निमित्त विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यकामांचे आयोजन करण्यात आले आले आहे. यावेळी 21 दिवस साजरा होणाऱ्या उत्सवात दररोज पारंपारीक आरती, ०१ ऑक्टोबर २०२३, रात्रौ पंचरंगी खेळांची स्पर्धा मैदान मिनिस्टर यासाठी प्रथम बक्षीस १५००/-, द्वितीय बक्षीस १०००/-,तृतीय बक्षीस ५००/-, चतुर्थ बक्षीस ५००/- • या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क नसून पहिल्या येणाऱ्या १६ खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे. ०२ ऑक्टोबर रोजी रात्रौ ०९:३० वा. तोंडपाठ आरती स्पर्धा या स्पर्धेत फक्त एकाच व्यक्तीने कोणत्याही दोन आरत्या वाद्यांच्या साथीने तोंडपाठ म्हणायच्या आहेत. मोठया आरत्यांना प्राधान्याने विचारात घेण्यात येईल. फक्त १५ स्पर्धकांना सहभाग मिळेल. प्रथम बक्षीस १५००/-, द्वितीय बक्षीस १०००/-, तृतीय बक्षीस ५००/-, मंगळवार दि. ०३ ऑक्टोबर रोजी रात्रौ ०९:३० वा. विठ्ठला देवी दशावतार नाटयमंडळ (राठीवडे मेस्त्री) यांचा दशावतार, बुधवार दि. ०४ ऑक्टोबर रोजी रात्रौ ०९:३० वा. फुगडी स्पर्धेत होणार असून त्यासाठी प्रथम बक्षीस ५०००/-, द्वितीय बक्षीस ३०००/-, तृतीय बक्षीस २०००/-, विजेत्यांना स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे., गुरुवार दि. ०५ ऑक्टोबर रोजी रात्रौ ०९:३० वा. गिरीष बाणे शिवरामेश्वर ट्रॅव्हल्स प्रस्तुत दशावतार कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ (लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत ) यांचा दशावतार, शुक्रवार दि. ०६ ऑक्टोबर २०२३ रात्रौ ०९:३० वा. नारळ लढत स्पर्धा प्रथम बक्षीस ७०००/-, द्वितीय बक्षीस ५०००/-शनिवार दि. ०७ ऑक्टोबर रोजी स. १०:०० वा. श्री सत्यनारायण महापुजा, पुजेनंतरची महाआरती- बालगोपाळ मंडळ, आचरा- वरचीवाडी. स्थानिक भजने – दुपारी ०३:०० ते रात्री ०७:३० पर्यंत. यादिवशी रात्रौ १०:०० वा. पारंपारिक डबलबारी, बुवा : श्री. संतोष शिर्सेकर (राजापूर) विरुद्ध बुवा श्री. गुंडु सावंत (कुडाळ) यांचे होणार आहे. रविवार दि. ०८ ऑक्टोबर रोजी रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे.
दिनांक 9 ऑक्टोबर रोजी मूर्तीचे विसर्जन होणार असून सकाळी ११:३० वा. उत्तरपुजा, आरती त्यानंतर श्री रामेश्वर मंदिर ते बागेश्री गणपती मंदिर मार्गे पिरावाडी, देवाच्या पारंपारिक वाद्यांच्या गजरात लव्याजम्यासह मिरवणूक निघणार आहे. कार्यक्रम व अधिक माहितीसाठी सपंर्क कारकून बाबा देसाई 9420308477 यांना करण्याचे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.