श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ एका पाकिस्तानी घुसखोराला रविवारी अटक करण्यात आली. नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करत असताना सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाल्यानंतर त्याला पकडण्यात यश आले. घुसखोर शस्त्रास्त्रांसह भारतात घुसण्याचा प्रयत्न करत असताना सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने त्याला वेळीच रोखले. त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली असून अधिक चौकशी केली जात आहे. त्याच्याकडून शस्त्रास्त्रे, दारुगोळा, मोबाईल-सीमकार्ड आदी दस्तावेज जप्त करण्यात आल्याचे सुरक्षा दलाकडून सांगण्यात आले.