वृत्तसंस्था/ कराची
दक्षिण आफ्रिकेत फेब्रुवारी महिन्यात होणाऱया आयसीसीच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकची फलंदाज डायना बेग दुखापतीमुळे खेळू शकणार नाही, अशी माहिती पीसीबीच्या प्रवक्त्याने दिली आहे.
पाक संघातील डायना बेग हिच्या उजव्या हाताच्या बोटाचे हाड मोडले असून तिला या दुखापतीतून बरे होण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. आता डायना बेगच्या जागी या स्पर्धेत पाक संघात बदली खेळाडू सदाफ शम्सची निवड केली आहे. दक्षिण आफ्रिकेत 11 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला प्रारंभ होत आहे. पाक महिला संघाचा या स्पर्धेत गट 2 मध्ये समावेश आहे. पाक संघाचा या स्पर्धेतील पहिला सामना 13 फेब्रुवारीला केपटाऊनमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताबरोबर होणार आहे.
पाक महिला संघ- बिस्मा मारुफ (कर्णधार), अमिन अन्वर, अलिया रियाझ, आयेशा नसीम, सदाफ शम्स, फातिमा साना, झवेरिया खान, मुनिबा अली, निशारा संधू, निदा दार, ओमिमा सोहेल, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सिद्रा नवाज आणि तुबा हसन. राखीव खेळाडू- गुलाम फातिमा आणि केनात इम्तियाज.