प्रतिनिधी,विटा
भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेचे विट्यात उत्साहात स्वागत झाले. स्वागतासाठी आलेल्या चिमुरड्या बाल वारकऱ्यांसमवेत टाळ हातात घेऊन पंकजाताई मुंडे यांनीही विठू नामाचा गजर केला. टाळ-मृदूंगाच्या गजरात पंकजाताईंनी टाळावर ठेका धरला आणि उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांना अभिवादन करीत शिवशक्ती परिक्रमा यात्रा कोल्हापूरला आंबाबाई दर्शनासाठी रवाना झाली. मोठी गर्दी आणि दौऱ्याला उशीर झालेला असतानाही पंकजाताईंनी गडबडीत देखिल बालचमूचा उत्साह वाढवण्यासाठी टाळाच्या तालावर ठेका धरल्याने त्यांच्यातील संवेदनशील पंकजाताईंचे पुन्हा दर्शन झाले.
भाजप नेत्या पंकजाताई मुंडे या अतिशय संवेदनशील नेत्या म्हणून परिचित आहेत. राजकारणात असतानाही त्यांनी नेहमीच संवेदनशीलता जपली आहे. त्यांच्या कृतीतून संवेदनशील पंकजाताईंचे महाराष्ट्राला अनेकदा दर्शन झाले आहे. राजकारणात असतानाही भावनाप्रधान असणाऱ्या पंकजाताईंच्या संवेदनशीलतेचा विट्यात पुन्हा एकदा प्रत्यय आला.
भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेचे विट्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. येथील लकडे प्लाझा समोर नागरीकांची मोठी गर्दी झाली होती. टाळ-मृदूंगाचा जयघोष, बॅण्ड पथक आणि शेकडो नागरीकांच्या उपस्थितीत जेसीबी मधून फुलांचा वर्षाव, फटाक्यांची आतिषबाजी करीत पंकजाताईंचे विटेकरांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी विक्रम लकडे, अरूण खरमाटे, संग्राम माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री पंकजा या सध्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शक्तीपिठांचे दर्शन घेत आहेत. या दौयात बुधवारी शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाचे दर्शन घेऊन माजी मंत्री मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा विटा मार्गे कोल्हापूरकडे आंबाबाईच्या दर्शनासाठी रवाना झाली. यावेळी विटा येथे नागरीकांनी अत्यंत उत्साही वातावरणात त्यांचे स्वागत केले. ओबीसी नेते अरूण खरमाटे, उद्योजक विक्रम लकडे, मुकूंद लकडे, विशाल लकडे, आयुष लकडे, ओबीसी नेते संग्राम माने, डी. ए माने, निलेश मार्ले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी पंकजाताईंवर जेसीबी मधून फुलांचा वर्षाव केला. पैठण येथील वारकरी फडातील बाल वारकरी पंकजाताईंच्या स्वागतासाठी उपस्थित होते. बाल वारकऱ्यांची चपळता आणि मृदंगाच्या तालावरील विठू नामाचा गजर पाहून पंकजाताईंनीही टाळ हाती घेत विठू नामाचा गजर केला. त्यामुळे बाल वारकऱ्यांचा उत्साह अधिकचा वाढला. पंकजाताईंच्या या संवेदनशीलतेची चर्चा त्यांचा ताफा रवाना झाल्यानंतर बराच काळ लकडे प्लाझा आणि विटा परिसरात सुरू होती.
लकडे प्लाझा येथे उद्योजिका श्रीमती अलका बाळासाहेब लकडे, साधना लकडे, ज्योती लकडे, प्रिया लकडे, नंदाताई मार्ले, अॅङ निशा मार्ले, गौरी लेंगरे यांनी लकडे उद्योग समुहाच्यावतीने पंकजाताईंचे स्वागत केले. एकुणच पंकजाताईंचा विट्यातील दौरा संवेदनशीलता आणि त्यांची लोकप्रियता यांचे दर्शन घडवणारा ठरला.