नाशिकमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद : गृहकर्जासह अन्य गुंतवणुकीसंदर्भात नागरिकांना मार्गदर्शन
प्रतिनिधी /नाशिक
नाशिकमध्ये नरेडकोच्या ‘होमेथॉन 2022 प्रॉपर्टी एक्स्पो’ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. देखील सहभागी झाली आहे. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) यांच्यातर्फे या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. ‘लोकमान्य’च्या नाशिकमध्ये नवीन सिडको, सावरकरनगर, इंदिरानगर, नाशिक रोड आणि जळगाव येथे शाखा आहेत.
सोबतच विभागीय कार्यालय आणि मेरीगोल्ड हा बँक्वेट हॉलदेखील आहे. लोकमान्यकडून विभागीय व्यवस्थापक, प्रकाश चितोडकर, समन्वयक हेमंत फडके, सर्व शाखा अधिकारीसह कर्मचारी नागरिकांना सदरच्या ‘होमेथॉन 2022 प्रॉपर्टी एक्स्पो’ प्रदर्शनात मार्गदर्शन करत आहेत.
या ठिकाणी ‘लोकमान्य’कडून सर्वसामान्यांच्या स्वप्नातील व वाजवी दराच्या घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी गृहकर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. सोबतच गृहकर्जासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, आवश्यक परवानगी यांच्या संदर्भातील माहितीही देण्यात येत आहे. याशिवाय इतर गुंतवणुकीसाठींचे पर्याय सांगून त्यांना गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन केले जात आहे. ‘लोकमान्य’च्या स्टॉलला प्रदर्शन बघायला येणाऱयांचा मोठा प्रतिसाद मिळत असून नाशिककरांना याचा मोठा लाभ होणार आहे.
छोटी गुंतवणूक मोठा परतावा
विशेषकरून म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक याबाबत अधिक विचारणा होत आहे. म्युच्युअल फंडात एकरकमी आणि एसआयपी अशा दोन्ही पद्धतींनी गुंतवणूक करता येते. दरमहा केवळ 1,000 रुपयांची गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवता येतो. म्युच्युअल फंडात गुंतविलेले पैसे चक्रवाढ पद्धतीने वाढतात. त्यामुळे छोटय़ा रकमेच्या गुंतवणुकीतून मोठय़ा रकमेचा परतावा कसा मिळतो याची माहितीही करून दिली जात आहे. सोबत वेगवेगळय़ा सुरक्षित ठेव योजना, विमा, बचत खाते यांचीही माहिती देण्यात येत आहे.