बजेटमधील स्मार्टवॉचला ब्लूटय़ूथ कॉलिंग फिचर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कमी बजेटजमधील पेबलचे स्पार्क स्मार्टवॉच भारतात नुकतेच सादर करण्यात आले आहे. या स्मार्टफोनच्या आधारे ग्राहकांना एका क्लिकमध्ये कॉलचा रिप्लाय देण्याची सुविधा उपलब्ध होणार असून इन बिल्ट मायक्रोफोनच्या मदतीने बोलण्याची सोय उपलब्ध होऊ शकणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
पेबल स्मार्कची किमत
कंपनीने पेबल स्पार्क स्मार्टवॉचची किंमत ही 1,999 रुपये ठेवली आहे. स्मार्टवॉचची विक्री ही एक्सक्लूसिव्ह फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. यावेळी कंपनीने दावा केला आहे, की या किमतीवर 1.7 इंच डिस्प्ले सोबत हे एकमेव स्मार्टवॉच उपलब्ध होणार असल्याचेही म्हटले आहे.
अन्य फिचर्स ः
w
डिस्प्लेमध्ये पूर्ण एचडी 240 ते 280 पिक्सल रिझोल्यूशन
w
मल्टीपल वॉच फेस, स्वॅपेबल स्ट्रेप
w
वन टॅप व्हाईस असस्टेट व फाइंड मायफोन
w
स्मार्टवॉचचे वजन फक्त 45 ग्रॅम
w
स्टॅण्डबाय मोडवर दिवस मिळणार बॅटरीबॅकअप