प्रतिनिधी /म्हापसा
वेरे रेईसमागूस पंचायतीमध्ये आपण पूर्वी सरपंच होतो त्यानंतर आज आमदारही झालो. आपल्या मतदारसंघात आम्ही सर्वत्र पॅनल ठेवले आहेत. आपल्या वेरे रेईसमागूस पंचायतीमध्ये आपल्या वॉर्डात जवळ जवळ सर्व कामे पूर्णत्वाकडे आली आहे. 15 फायनेन्सची काही कामे तात्रिक कारणामुळे अडकून पडली आहेत. 14 फायनेन्स आला तेव्हा त्याची प्रक्रिया कशी करावी हे पंचायतीमध्ये सचिव होते त्यांना माहीत नव्हते. आपण सरकारकडे मागणी केली त्यांना याकामी प्रशिक्षण द्याव तसे झाल्यास ते सहजरित्या सोपे होईल कारण 15 फायनेन्सकडे यंदा खूप पैसे आले आहे तो वाटण्यास त्यांना सहज सोपे होईल अशी माहिती साळगावचे आमदार केदार नाईक यांनी दिली.
आज शेवटच्या दिवशी वॉर्ड 9 व 10 मधून अर्ज दाखल करण्यासाठी आलो आहोत. आमच्या सर्व उमेदवारांनी जे आपल्या प्रभागात काम केले आहे त्याची पावती मतदार त्यांना देणार आहेत व त्याबळावर आपल्या पॅनलचा विजय निश्चित असल्याची माहिती केदार नाईक यांनी दिली. केदार नाईक यांच्या पॅनलमधील संगीता राजेश भोसले यांच्या विरोधात अन्य कुणीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याने त्या जवळ जवळ बिनविरोध निवडून आल्यात जमा आहे. छाननी झाल्यावर निर्वाचन अधिकारी त्यांच्या नावाची घोषणा करणार आहेत.