विविध रोपांचे प्रदर्शन-मार्गदर्शन-विक्री : बागायत खात्याची माहिती : उदंड प्रतिसादाचा विश्वास
प्रतिनिधी /बेळगाव
बागायत शेतकरी, पर्यावरण आणि पुष्पप्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी बागायत खात्यामार्फत 1 जुलैपासून रोप बाजार भरविला जाणार आहे. क्लब रोड येथील हय़ूमपार्कमध्ये हा बाजार तीन दिवस चालणार आहे. यामध्ये विविध प्रजातींची रोपे, प्रदर्शन, विक्री आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. संबंधितांनी या रोप बाजाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन बागायत खात्याने केले आहे.
दरवषी खात्यामार्फत पावसाळय़ाच्या तोंडावर रोप बाजार भरवून नागरिकांना सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून दिली जातात. यंदाही एकाच छताखाली विविध रोपांचे प्रदर्शन मांडले जाणार आहे. यामध्ये आंबा, पेरू, लिंबू, कडीपत्ता, नारळ, फणस, चिकू यासह शोभिवंत गुलाब, पाम, जास्वंदी, कुट्रॉन्स आदी पुष्परोपेही ठेवली जाणार आहेत. शिवाय अळंबी निर्मिती व मधुमक्षिका पालनाबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. खात्यामार्फत बागायत क्षेत्र वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून रोप बाजार भरविला जात आहे. गतवषी झालेल्या रोप बाजाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, नागरिकांनी विविध रंगीबेरंगी फुलांची रोपे खरेदी केली होती. यंदा देखील रोप बाजाराला उदंड प्रतिसाद मिळेल, असा विश्वास खात्याने वर्तविला आहे.
पावसाला सुरुवात झाल्याने बागायत खात्याने रोप बाजार भरविण्याचा निर्णय घेतला आहे. घरासभोवती आणि बागायत करण्यासाठी विविध जातीची रोपे वाजवी दरात उपलब्ध होणार आहेत. शिवाय रोपांच्या संवर्धन आणि संरक्षणाबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.
सवलतीच्या दरात मिळणार
नागरिकांना एकाच छताखाली विविध जातीची रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. फळ रोपांबरोबर पुष्प आणि इतर रोपेही ठेवली जाणार आहेत. स्थानिक वातावरणात संवर्धन होणारी रोपे नागरिकांना सवलतीच्या दरात मिळणार आहेत. येत्या शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस हा रोप बाजार नागरिकांसाठी खुला आहे.
– महांतेश मुरगोड (उपनिर्देशक बागायत खाते)