आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विरोधी आघाडी एकत्र येत असताना, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी होणारा पंतप्रधान ‘पत्नीशिवाय नसावा’ असे म्हणून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली आहे.
एएनआयशी बोलताना लालू प्रसाद यादव म्हणाले कि, जो पंतप्रधान होईल तो पत्नीशिवाय नसावा. पत्नीशिवाय पंतप्रधान निवासस्थानी राहणे चुकीचे असून हे आता थांबवले पाहिजे असे ते म्हणाले. यापुर्वी लालू प्रसाद यादव यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लग्न करण्याचा सल्ला दिला होता. विरोधी पक्षाच्या आघाडीकडून राहूल गांधींना पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहत आहेत.
दिल्लीच्या दौऱ्यावर असलेल्या लालू प्रसाद यादव यांनी माध्यमांसमोर बोलताना विरोधी आघाडीला किमान 300 जागा मिळतील.” असा विश्वास व्यक्त केली. एकाही भ्रष्टाचारी व्यक्तीला सोडले जाणार नाही या पंतप्रधान मोदींनी केलेल्या विधानावर भाष्य करताना लालू प्रसाद यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अजित पवारांच्या समावेशाचा संदर्भ देत लालू प्रसाद यादव म्हणाले “तुम्ही पाहिलं नाही का त्यांनी त्याच व्यक्तीला मंत्री केले आहे ज्याला त्यांनी आधी भ्रष्ट म्हटले होते? नरेंद्र मोदी हेच भ्रष्ट राजकारण्यांचे संयोजक आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचे उदाहरण पाहील्यास 2 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाले.”
याआधी 23 जून रोजी 17 पक्षांचे प्रतिनिधी पटना येथे एकत्र येऊन मोदी विरोधकांची एकजूट दाखवली होती. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी विरोधी पक्षांच्या पुढील बैठकीची तारीख लवकरच घोषित केली जाऊन संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ही बैठक नक्कीच होणार असल्य़ाचे म्हटले आहे.