Satara News : पोलादपूर महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्ता पुढील १५ दिवस बंद करण्यात आला आहे. हा रस्ता सद्य:स्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहतुकीकरीता बंद करण्याबाबत जिल्हादंडाधिकारी रायगड -अलिबाग यांनी निर्देश दिले आहेत.
याप्रकरणी पाऊस,भुस्खलन, दरड कोसळणे इत्यादी परिस्थितीबाबतचा अहवाल दर 15 दिवसांना देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हा अहवाल दर १५ दिवसांनी पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड-अलिबाग व उपविभागीय अधिकारी महाड यांनी सादर करण्यास सांगितले आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी रायगड- अलिबाग संदेश शिर्के यांनी दिली.
वाहतुकीचा दर १५ दिवसांनी सविस्तर आढावा घेऊन हा घाट रस्ता बंद ठेवण्याच्या अनुषंगाने अहवाल दर १५ दिवसांनी पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड अलिबाग व उपविभागीय अधिकारी महाड यांनी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे अपर जिल्हादंडाधिकारी रायगड- अलिबाग संदेश शिर्के यांनी कळविले आहे.