शिवजयंती मिरवणुकीसाठी पोलीस दलाकडून व्यापक तयारी सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
शिवजयंती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने व्यापक तयारी सुरू केली आहे. तब्बल दोन वर्षांनंतर बेळगाव येथे मिरवणूक होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही जोरदार तयारी केली आहे. शुक्रवारी वरि÷ पोलीस अधिकाऱयांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली.
कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, मार्केटचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी यांच्यासह शहरातील इतर अधिकाऱयांनीही मिरवणूक मार्गाची पाहणी केली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात शिवजयंती मिरवणूक झाली नाही. सध्या बहुतेक नवे अधिकारी कार्यरत आहेत. चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी हजारो शिवभक्त बेळगावला येतात. महाराष्ट्र, गोव्याहूनही शिवप्रेमी बेळगावात दाखल होतात. या पार्श्वभूमीवर व्यापक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येतो.
सध्या पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, उपायुक्त रविंद्र गडादी, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा हे तीनही अधिकारी बेळगावला नवे आहेत. शिवजयंती मिरवणूक उत्साहात व शांततेत पार पाडावी यासाठी पोलीस दलाने तयारी सुरू केली असून शुक्रवारी अधिकाऱयांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली.
पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत व्यापक बैठक होणार
काकतीवेस, गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजारसह संपूर्ण मार्गाची माहिती घेण्यात आली. वेगवेगळय़ा पोलीस स्थानकात शिवजयंती उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱयांची बैठक घेऊन त्यांच्याकडूनही माहिती घेतली जात आहे. पोलीस स्थानकनिहाय बैठकीनंतर पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत व्यापक बैठक होणार आहेत.