रत्नागिरी / प्रतिनिधी
शहरातील मुरूगवाडा पांढरा समुद्र परिसरात शनिवार 15 ऑक्टोबर रोजी रात्री पोलिसांनी छापा टाकून 17 हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे. गांजा विक्री करणाऱ्या अजय कारेकर (25) या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे असलेल्या 70 पाकिटांमध्ये अर्धा किलो गांजा पोलिसांना सापडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुरुगवाडा, पांढरा समुद्र येथे गांजाची विक्री होत माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शांताराम महाले, हवालदार प्रसाद घोसाळे, हवाल अमोल भोसले, पोलीस हवालदार विलास जाधव, पोलीस नाईक आशिष भालेकर, पोलीस नाईक वैभव नार्वेकर, पोलीस नाईक पंकज बडेलकर, प्रवीण पाटील यांनी सापळा रचला. तरुणाकडे गांजा असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अर्धा किलो गांजा 70 पाकिटांमध्ये आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.