अधिकाऱयांच्या पाटर्य़ामध्ये सर्व सोयीसुविधा एडवीन पुरवायचा
प्रतिनिधी/ पणजी
सोनाली फोगट खूनप्रकरणाला दिवसेंदिवस वेगवेगळी दिशा मिळत आहे. हैदराबाद पोलिसांकडून एडवीन नुनीसला अटक करण्यात गोवा पोलिसांनी सहकार्य केले नसल्याचे आरोप केले. ते आरोप गोवा पोलिसांनी फेटाळले. नंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व ड्रग्ज पॅडलरच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले मात्र मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, राज्यात येणाऱया आयपीएस अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांना स्थानिक पोलिसांकडूनच कर्लिज रेस्टॉरंटमध्येच मेजवानी देण्यात येत होती. सर्व सोयीसुविधा एडवीन नुनीस पुरवित होता. त्यामुळे स्थानिक पोलीस त्याच्यावर कोणतीच कारवाई करत नव्हते. पण सोनाली फोगट खूनप्रकरणाची चौकशी थेट वरिष्ठ अधिकाऱयांकडे गेल्याने स्थानिक पोलिसांचे काही चालले नाही. एडवीनला यातून बाजूला करण्यासाठी स्थानिक पोलिसांनी खूप प्रयत्नही केले, मात्र वरिष्ठ अधिकाऱयांसमोर त्यांचे काही चालले नाही, अशी माहिती हाती आली आहे.
बाबू नामक व्यक्ती पोलिसांचे हप्ते, मेजवानी देण्याबाबतची कामे पाहत असे. कोण अधिकारी कधी येणार, त्यांच्यासोबत कोण आहेत याची माहिती घेऊन तो सर्व माहिती एडवीनपर्यंत पोहोचवायचा. त्यानुसार एडवीन त्यांची सोय करायचा. कर्लिज रेस्टॉरंटचा आपण मालक नसल्याचे एडवीन नुनीसने सांगितले असले तरी सर्व व्यवहार तोच सांभाळायचा ही माहिती उघड झाली आहे. ‘आम्हाला तुम्ही सांभाळा, तुम्हाला आम्ही सांभाळू’ याप्रमाणे पोलीस व एडवीनचे सुरु होते. स्थानिकांनी आवाज उठविल्यास पोलीस कोणतीच कारवाई करत नव्हते उलट बार ऍण्ड रेस्टॉरंट विरोधात आवाज उठविणाऱयांविरोधात कटकारस्थान करायचे. त्यामुळे त्यांच्या विरोधात आवाज उठविण्यास कोणी जात नव्हते.
दरदिवशी मोठय़ा प्रमाणात ड्रग्ज व्यवसाय
किनारी भागात ड्रग्स पॅडलर म्हणून तिघांना पोलिसांनी पकडले असले तरी किनारीभागात मोठय़ा प्रमाणात अमलीपदार्थ व्यवसाय होतो. हा व्यवहार कोण करतो, यात कोण कोण गुंतलेले आहेत याची सर्व माहिती स्थानिक पोलिसांना आहे, मात्र पोलीस त्याकडे डोळेझाक करीत असल्याचे उघड झाले आहे. आता पोलीस एका-दोघांना पकडून कारवाई केल्याचे फक्त दाखवत आहेत. नायजेरियन, रशियन आदी विदेशींना किरकोळ अमलीपदार्थासह पकडून कारवाई केल्याचा दिखावा केला जात आहे. स्थानिक पोलिसांना कुठे, कोण, किती मोठय़ा प्रमाणात काळाधंदा करीत आहे याची सर्व माहिती आहे मात्र ते फक्त महिन्याच्या अखेरीस आपले खिसे भरण्यासाठी त्या ठिकाणी जातात. मग अशा ड्रग्ज पॅडलरांवर कारवाई करण्याची हिंमत पोलिसांना कशी होईल, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली.
मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळायचे की हितसंबंध, पोलिसांसमोर गहन प्रश्न
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी गुन्हा अन्वेषण विभाग (एएनसी) आणखी मजबूत बनविले जाईल. आवश्यक तेवढे पोलीस अधिकारी, यंत्रणा देण्याची तयारी दर्शवून ड्रग्ज पॅडलरना पकडून आत बसवा, असे आदेशच काढले आहेत. मात्र या आदेशाचे स्थानिक पोलीस कितपत पालन करतात हे पाहावे लागेल. ड्रग्स पॅडलरकडून मिळणारा हप्ता महत्त्वाचा की मुख्यमंत्र्यांचा आदेश? सोनाली फोगटप्रकरणावरुन गोव्याची खूप बदनामी होत चालली आहे. काँग्रेसनेही सरकारवर गुन्हेगारी राज्य बनविल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पोलिसांवर दबाव वाढला आहे.
हैदराबाद पोलीस अन् एडवीन नुनीसचा शोध
दरम्यान, पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद पोलीस आयुक्तांनी शुक्रवारी गोवा पोलीस सहकार्य करीत नसल्याचा केलेला आरोप पूर्णतः खरा असल्याचे सांगितले. पंधरा दिवसांपूर्वी हैदराबाद पोलीस एडवीन नुनीसला पकडण्यासाठी आले होते. स्थानिक पोलिसांनी त्यांना आपल्या जीपमधून गोवा फिरवल्याचे वृत्त आहे. मात्र त्यांना एडवीन नुनीस सापडला नाही. हैदराबाद पोलिसांना गोव्यातले काहीच माहिती नव्हती त्याचा फायदा गोवा पोलिसांनी घेतला आणि सर्व माहिती एडवीन नुनीसला पुरवित राहिले. त्यामुळे हैदराबाद पोलीस कर्लिज हॉटेलमध्ये गेले तेव्हा एडवीन तेथून पसार झाला होता. ही सर्व घटना खरी असल्याची माहिती आता समोर आली आहे.