नवी दिल्ली : लक्झरी कार निर्मिती करणारी कंपनी पोर्शे इंडियाची किरकोळ विक्री जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये जवळपास 37 टक्क्यांवर राहिल्याची माहिती आहे. यामध्ये विक्री जवळपास 193 युनिटवर पोहोचली आहे. कंपनीने या संदर्भात बुधवारी ही माहिती दिली आहे.
पोर्शेच्या माहितीनुसार एक वर्षाच्या अगोदर समान तिमाहीत त्यांनी एकूण 141 कार्सची विक्री केली होती. चालू तिमाहीत कंपनीने 193 वाहनांची किरकोळ विक्रीसोबत वर्ष 2022मध्ये आतापर्यंत एकूण 571 गाडय़ा विकल्या आहेत. अशी स्थिती वर्ष 2013 मध्ये राहिली होती, तेव्हा 534 युनिटची विक्री करत मागील विक्रम मोडले होते.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान निव्वळ कार विक्रीत 71 टक्क्यांची वृद्धी नेंदवली आहे. स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमधील शाखा पोर्शे इंडियाने चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत देशातील बाजारात जवळपास 378 कार्सची विक्री केली होती.