बेंगळूर
जानेवारी ते मार्चच्या 2022 तिमाहीमध्ये पोर्शे इंडिया कंपनीने कार विक्रीत 22 टक्के इतकी वाढ दर्शविली आहे. कंपनीने सदरच्या कालावधीमध्ये 188 कार्सची विक्री केली आहे. 2013 नंतर पहिल्यांदा तिमाहीमध्ये होणारी विक्री ही सर्वाधिक मानली जात आहे. कॅलेंडर वर्ष 2021 मध्ये एकंदर 62 टक्के इतकी कार विक्री मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये वाढीव दिसली आहे.