चिपळुणात खड्डे भरत असतानाच ट्रक-दुचाकी अपघात, पाॅवर हाऊस येथील घटना, महामार्ग ठेकेदार न आल्याने संतप्त जमावाने दोन तास रोखला महामार्ग
प्रतिनिधी/चिपळूण
मुंबई-गोवा महार्गावरचे खड्डे भरतेवेळी कोणतीही सुरक्षितता न घेतल्याने अवजवड मालवाहतूक ट्रकखाली दुचाकीस्वार सापडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी 3 वाजता शहरातील पाॅवर हाऊस येथे घडली. किरण कृष्णा घाणेकर (वय ३२, कोंडमळा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघात होताच ट्रक चालकाने पलायन केले.
याघटनेनंतर बराच वेळ होऊनही घटनास्थळी महामार्ग कंपनीचा ठेकेदार न आल्याने अखेर संतप्त जमावाने थेट महामार्ग रोखून धरला. यामुळे दोन्ही बाजूंकडून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, ठेकेदार कंपनीकडून योग्यती नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन मिळल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.