टिळकवाडी, सहय़ाद्रीनगर, हनुमाननगर येथे वीज ठप्प राहणार
प्रतिनिधी /बेळगाव
रविवार दि. 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शहरातील विविध भागात वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. दुरुस्ती कामानिमित्त वीजपुरवठा राहणार नाही, अशी माहिती हेस्कॉमच्या अधिकाऱयांनी दिली आहे.
रविवारी एफ-1 फिडर कुमारस्वामी लेआऊट, विद्यागिरी, सारथीनगर, एफ-2 फिडर कार्यक्षेत्रातील हनुमाननगर, स्टेज 1, 2, 3, 4, कुवेंपूनगर, मॉडर्न को-ऑप. हौसिंग सोसायटी (बसवेश्वरनगर), टीव्ही सेंटर, बॉक्साईट रोड, कुमारस्वामी लेआऊट, एफ-3 फिडर कार्यक्षेत्रातील सहय़ाद्रीनगर, स्कीम क्रमांक 47, 51, बुडा, कुवेंपूनगर, जयनगर, विजयनगर, पाईपलाईन रोड, सैनिकनगर, लक्ष्मी टेकडी पाणीपुरवठा विभाग, विनायकनगर, हिंडलगा, गणेश मंदिर परिसर, महाबळेश्वरनगर परिसरात वीजपुरवठा खंडित राहणार आहे.
एफ-4 फिडरच्या कार्यक्षेत्रातील पाणी पुरवठा प्रकल्प, एफ-1 फिडर टिळकवाडी परिसरातील मारुती कॉलनी, मराठा कॉलनी, एस. व्ही. कॉलनी, काँग्रेस रोड, पहिले रेल्वेगेट, नेहरु रोड, सावरकर रोड, रॉय रोड, व्हॅक्सिन डेपो मैदान, रानडे रोड, आगरकर रोड, दुसरा रेल्वेगेट, हिंदूनगर, राणा प्रताप रोड, रविंद्रनाथ टागोर रोड, एफ-2 हिंदवाडी फिडर कार्यक्षेत्रातील गोवावेस, गुडस्शेड रोड, सोमवारपेठ, मंगळवारपेठ, बुधवारपेठ, गुरुवारपेठ, शुक्रवारपेठ, देशमुख रोड, हिंदवाडी, खानापूर रोड परिसरात वीजपुरवठा खंडित राहणार आहे.
एफ-3 जक्कीनहोंडा फिडर कार्यक्षेत्रातील इंद्रप्रस्थनगर, गुडस्शेड रोड, बेन्नागी अपार्टमेंट, डी. पी.स्कूल, केएचबी कॉलनी, एफ-4 स्वामी विवेकानंद कॉलनी फिडर कार्यक्षेत्रातील एम. जी. कॉलनी, काँग्रेस रोड, स्वामी विवेकानंद कॉलनी, मराठा कॉलनी परिसरात रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत वीजपुरवठा राहणार नाही. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन अधिकाऱयांनी केले आहे.
शनिवार, रविवारी उद्यमबाग परिसरात वीज नाही : सलग 6 आठवडे दुरुस्तीनिमित्त खंडित पुरवठा
शनिवार दि. 5 व रविवार दि. 6 नोव्हेंबर रोजी उद्यमबाग परिसरात वीजपुरवठा खंडित राहणार आहे. शनिवारी सकाळी 6 ते रविवारी सायंकाळी 6 पर्यंत उद्यमबाग औद्योगिक वसाहतीत वीजपुरवठा खंडित राहणार असून सलग सहा आठवडे दुरुस्तीनिमित्त आठवडय़ातून दोन दिवस वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
सुवर्ण विधानसौधमध्ये होणाऱया विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर 110-केव्ही वीज वितरण केंद्राच्या कार्यक्षेत्रात दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. दि. 5 व 6 नोव्हेंबर, 12 व 13 नोव्हेंबर, 19 व 20 नोव्हेंबर, 26 व 27 नोव्हेंबर, 4 व 5 डिसेंबर रोजी या परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
एफ-1, चेंबर ऑफ कॉमर्स फिडर कार्यक्षेत्रातील खानापूर रोड, उद्यमबाग औद्योगिक वसाहत, एफ-4 गुरुप्रसाद कॉलनी फिडरच्या कार्यक्षेत्रातील गुरुप्रसाद कॉलनी, राणी चन्नम्मानगर, तिसरे रेल्वेगेट, वसंत विहारनगर, सुभाषचंद्र कॉलनी, उत्सव हॉटेल, एफ-5 डच इंडस्ट्रीयल फिडर व एफ-6 बेम्को इंडस्ट्रीयल फिडर कार्यक्षेत्रात येणाऱया औद्योगिक वसाहतीत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
एफ-7 अशोक आयर्न इंडस्ट्रीयल फिडर, एफ-10 अरुण इंजिनिअरिंग फिडर, एफ-12 एकेपी फिडर, एफ-13 गॅलक्सी फिडर कार्यक्षेत्रातील औद्योगिक वसाहत, एफ-14 जीआयटी फिडरच्या कार्यक्षेत्रातील जीआयटी, महावीरनगर, खानापूर रोड, उद्यमबाग, एफ-15 शांती आयर्न फिडर कार्यक्षेत्रातील औद्योगिक वसाहत, एफ-16 जैतनमाळ कार्यक्षेत्रातील समेदनगर, ज्ञान प्रबोधन शाळेजवळ, एफ-17 भवानीनगर फिडर कार्यक्षेत्रातील गुरुप्रसाद कॉलनी, मंडोळी रोड, पार्वतीनगर, विश्वकर्मा कॉलनी, स्वामीनाथ कॉलनी, डिफेन्स कॉलनी, जैतनमाळ परिसरात वीजपुरवठा खंडित राहणार आहे. मच्छे येथे काही भागातही वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.