21, 22, 24 नोव्हेंबरला करणार तज्ञांशी चर्चा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अर्थमंत्री निर्मला सीतारामन 21 नोव्हेंबरपासून अर्थसंकल्पपूर्व (प्री-बजेट) बैठकांची मालिका सुरू करणार आहेत. फेबुवारी महिन्यात अर्थमंत्री संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करतात. हा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी अर्थसंकल्पापूर्वी विविध भागधारकांसोबत बैठका घेतल्या जातात. त्याच पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी इंडस्ट्री चेंबर्स, इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर आणि पर्यावरण तज्ञांसोबत तीन गट बैठका घेणार आहेत. यामध्ये सर्वसाधारण अर्थसंकल्पासाठी सूचना मागवल्या जाणार आहेत. यादरम्यान हवामान बदल आणि पायाभूत सुविधांशी संबंधित मुद्दय़ांवर विशेष लक्ष दिले जाईल. 22 नोव्हेंबर रोजी अर्थमंत्री कृषी, कृषी प्रक्रिया उद्योग, वित्तीय क्षेत्र आणि भांडवली बाजाराच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत. तर 24 नोव्हेंबरला आरोग्य, शिक्षण आणि जलतज्ञांशी चर्चा करणार आहेत.