श्री कपिलेश्वर मंदिर, इन्फिनिटी फिल्म प्रॉडक्शनतर्फे आयोजन
प्रतिनिधी/ बेळगाव
श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिर आणि इन्फिनिटी फिल्म प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारपासून भजन गायन स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला. व्यासपीठावर सुनील चौगुले, अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, उपाध्यक्ष सतीश निलजकर, अनुप पवार यासह सदस्य उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व विठ्ठल मूर्तीचे पूजन झाले. गायत्री मंडोळकर व शिवानी बस्तवाडकर यांनी पंचपदी सादर केली. त्यानंतर भजन स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेसाठी 40 हून अधिक संघांनी नोंद केली आहे. पहिल्या दिवशी 5 संघांनी भजन सादर केले. वडगाव येथील सिद्देश्वर भजन संघ, भारतनगर येथील श्रीमाता भक्ती महिला मंडळ, वडगाव येथील ज्ञानेश्वर भजनी मंडळ, महाद्वार रोड येथील श्री माऊली महिला भजनी मंडळ, शहापूर येथील श्री नामदेव भजनी मंडळाने एकापेक्षा एक सुंदर भजन सादर केले.
विजेत्या भजनी मंडळांना देण्यात येणाऱया चषकांचे अनावरण करण्यात आले. भावी पिढीमध्ये भजन संस्कृती रुजावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वर सप्तसुरांचे, नाद भजनाचे या नावाने ही स्पर्धा 22 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत बेळगाव, खानापूर, चंदगड तालुक्मयातील भजनी मंडळे सहभागी होणार आहेत. विजेत्या भजनी मंडळांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर गायक, टाळ वादक, तबला वादक आणि उत्कृ÷ भजनी मंडळांना बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. याप्रसंगी वारकरी, भक्त मंडळी, नागरिक, श्रोते उपस्थित होते. सूत्रसंचालन तेजस्विनी सोंगसाळे यांनी केले.