वाळपई पालिका मुख्याधिकारी सूर्याजीराव राणे यांची माहिती
प्रतिनिधी /वाळपई
वाळपई नगरपालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामे 28 मेपर्यंत पूर्ण होणार आहेत. सध्या ही कामे युद्धपातळीवर सुरु असून नाला, गटार उपासनेच्या कामाला प्रारंभ झाला आहे. अनेक प्रभागातील गटारे उपासणी काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे सुरू आहेत, अशी माहिती पालिका मुख्याधिकारी सूर्याजीराव राणे यांनी दिली.
वाळपई नगरपालिका क्षेत्रात एकूण 10 प्रभाग आहेत. सर्व प्रभागांमधील गटार उपासणीची कामे पंधरा दिवसापूर्वी हाती घेण्यात आली आहेत. गटारांची साफसफाई पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पालिका क्षेत्रात गटार उपसणे पूर्ण होत नाही तोपर्यंत पावसाळ्यात अडचणी निर्माण होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे सदर कामांना प्राधान्य देण्यात आले असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
शहरातील गटारे कचऱयाने भरली होती, ती साफ करण्यात आली आहेत. गटारावरील लाद्या दूर करून सफाई करण्यावर भर दिला आहे. गटारात कचरा फेकू नये अशी विनवणी करून सुद्धा लोक दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे अनेक भागातील गटारे कचऱयाने भरली आहेत. ती साफ्ढ न केल्यास पावसाळयात पाणी तुंबण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे श्हर भागातील गटारे उपासणीच्या कामाला प्राधान्य दिले आल्याचे राणे यांनी सांगितले.
वाळपई वनप्रशिक्षण केंद्राच्या समोर रस्त्यावर सातत्याने पाणी साचते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. दुचाकी वाहनांना अडथळा निर्माण होत असून अनेक वेळा दुचाकी घसरून अपघात घडले आहेत. सदर ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाय योजना केली आहे. त्यामुळे यंदा पावसाचे पाणी त्या ठिकाणी साचणार नाही असे मुख्याधिकारी राणे यांनी सांगितले.
मान्सूनपूर्व कामांना पंधरा दिवसापूर्वी सुरवात करण्यात आली आहे. आगामी पाच ते सहा दिवसांत काम पूर्ण होणार आहे. बहुतेक गटारे व नाल्यांची सफ्ढाई करण्यात आली आहे, असे नगराध्यक्ष सेहझीन शेख यांनी सांगितले.
नाल्यांची सफ्ढाई पूर्ण : राणे
शहरातील नाल्यांची साफसफाई करण्यात आली आहे. नाल्यामध्ये साचलेल्या घाणीमुळे दुर्गंधी पसरत असून त्याचा पर्यावरणावर परिणाम होऊ नये याकडे विशेष लक्ष देण्यात आले असून नाल्यामध्ये असलेली घाण बाहेर काढून नाले सफाई पूर्ण करण्यात आली असल्याचे राणे यांनी सांगितले.