48 कार्स येणार यावर्षी : लक्झरी इलेक्ट्रिक कार्सही येणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024 मध्ये जवळपास 12 एसयूव्ही प्रकारातील इलेक्ट्रिक कार्स बाजारात दाखल करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. 48 पॅसेंजर कारपैकी 11 इलेक्ट्रिक कार्स असणार आहेत. लक्झरी कार्सही यावर्षी बाजारात उतरवल्या जाणार आहेत. बीएमडब्ल्यू, मर्सिडिज बेंझ, ऑडी व वॉल्वो यांच्या कार्स बाजारात येत्या काळात बाजारात दाखल होतील.
मागच्या वर्षी 54 नव्या कार्स दाखल झाल्या होत्या. त्यात फक्त 6 इलेक्ट्रिक कार्स होत्या. इलेक्ट्रिक कार्स जास्तीत जास्त उतरवण्यावर कंपन्यांचा भर असणार आहे. लक्झरी कार निर्मात्या कंपन्याही इलेक्ट्रिक कार्स दाखल करण्यासाठी उत्सुक आहेत असे समजते. चार्जिंग केंद्रांची उभारणी त्या तुलनेत गतीने होण्याची सध्याची गरज आहे. प्रत्येक प्रकारात ग्राहकांकडून इलेक्ट्रिक कारची मागणी होताना दिसत आहे. गेल्या वर्षी तर लक्झरी इलेक्ट्रिक कार्सची विक्री 142टक्के अधिक राहिली आहे. लक्झरी पेट्रोलवरील कार्सची विक्री दुसरीकडे 8 टक्के घसरणीत राहिली आहे, असेही समजते. डिझेल कार्सची विक्री मात्र 16 टक्के वाढीव नोंदली गेली आहे.
मर्सिडिज बेंज वाटा वाढवणार
पुढच्या 4 वर्षाच्या कालावधीत मर्सिडिज बेंजच्या एकूण कार प्रकारातील विक्रीत 25 टक्के वाटा इलेक्ट्रिक कार्सचा असणार असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी कंपनीने सविस्तर योजना बनवली आहे.