बेळगाव : आंतरराष्ट्रीय कर्करोग निर्मूलन दिनानिमित्त टिळकवाडी येथे डॉ. अभिनंदन संचालित हंजी हॉस्पिटलमध्ये ब्रम्हाकुमारीच्या महांतेशनगर वैद्यकीय शाखेतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पाहुण्यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून उद्घाटन करण्यात आले. डॉ. हनु पद्मजा हंजी यांनी स्वागत केले. ब्रम्हाकुमारी डॉ. संगीता बेळगावमठ यांनी राजयोगामुळे मन आणि शरीर कसे निरोगी ठेवता येते, विचारांचा शरीरावर कसा परिणाम होतो, हे सांगताना मन आनंदी असल्यास पचनसंस्था आणि श्वसनसंस्था सुरळीत चालते, असे सांगितले.
केएलईच्या डॉ. मुक्ता यांनी कर्करोग टाळण्यासाठी काय करायला हवे, याची माहिती दिली. डॉ. अभिनंदन हंजी यांनी कर्करोगाचे कोणतेही लक्षण असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे सांगितले. ब्रम्हाकुमारी अनिता यांनी ध्यानधारणाचे प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी कर्करोगाशी सामना केलेल्या काही जणांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन रेणूका लोखंडे यांनी केले. ब्रम्हाकुमार श्रीकांत यांनी आभार मानले.