लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्याकडून संकल्पनेचे स्वागत
प्रतिनिधी / काणकोण
संपूर्ण विश्वाला परिवार मानणारी आपली संस्कृती असून याच संस्कृतीमधून निराधारांना आधार देण्याचे काम सभापती रमेश तवडकर यांच्या श्रमधाम संकल्पनेतून साकार झालेले आहे. सामुदायिक तत्वावरच विकसित भरताची स्वप्ने पूर्ण होऊ शकतील असे सांगून अंतीम व्यक्तीपर्यंत सुशासन नेण्याचे काम या मतदार संघात चालू असल्याबद्ल लोकसभेचे सभापती श्री. ओम बिर्ला यानी एंकदर संकल्पनेचे कौतुक केले.
काणकोणचे आमदात तथा सभापती रमेश तवडकर यांच्या श्रमधाम संकल्पनेतून काणकोण मतदार संघात बलराम चॅरिटेबल ट्रस्टाच्या माध्यमातून उभारलेल्या 20 घरांचा लोकार्पण आणि घर मालकांना किल्ल्या प्रदान करण्याच्या कार्यक्रमाला लोकसभेचे सभापती श्री. ओम बिर्ला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या संकल्पनेतून उभारलेल्या घर मालकांना किल्ल्या प्रदान करण्यात आल्या.
काणकोणच्या शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रिय पर्यटन मंत्री श्रीपाद सावंत, गोवा भाजपाचे केंद्रिय नेते बी. सतीश, भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार दाजी साळकर, संकल्प आमोणकर, उल्हास तुयेकर, माजी खासदार अॅड नरेंद्र सावईकर, दामोदर नाईक, सर्वानंद भगत,काणकोणचे नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर, माजी आमदार मोहन आमशेकर, धर्मा चोडणकर, सरपंच प्रतीजा बांदेकर, सेजल गावकर, प्रितल फनार्डिस, काणकोणचे उप्&जिल्हाधिकारी रमेश गावकर, मामलेदार मनोज कोरगावकर, काणकोण पालिकेचे नगरसेवक, विविध पंचायतीचे पंच सदस्य उपस्थित होते.
शहरात देखील तयार होत नाहीत अशी शैक्षणिक सुविधा काणकोण मतदार संघात होत असलेली पाहून आपल्याला समाधान होत आहे. कोरोनाच्या काळात भारताने खूप चांगली सेवा सगळयांना दिली. सामुदायिक तत्वावरच चांगल्या गोष्टी निर्माण होत असतात. येणाऱ्या काळात गोवा देखील शिक्षण आणि रोजगाराच्या बाबतीत परिपूर्ण झालेला पहायला मिळेल आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वपन असल्याचे मत सभापती ओम बिर्ला यानी यावेळी मांडले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
जमीन मालकांनी मानवता दृष्टिकोन सांभाळून जर जागा दिल्या तर सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना. अटल आसरा योजना, मुख्यमंत्री आवास योजनेत आवश्यक ते बदल करून ही योजना अधिक सुलभ करण्याकडे लक्ष दिले जाईल. सभापती रमेश तवडकर येंच्या संकल्पनेला सरकारचे संपूर्ण सहकार्य असेल. त्यांची श्रमधाम संकल्पना गोव्यातील अन्य मतदार संघात देखील राबविण्याची तयारी काही आमदारांनी चालविली असून त्यासाठी सकारात्मक भावना ठेवायला हवीं असे सांगून विकास आणि अन्य गोष्टीत काणकोण मतदार संघात प्रथम क्रमांकावर असेल असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी यावेळी व्यक्त केले.
केंद्रिय मंत्री श्रीपाद नाईक
श्रमधाम योजनेद्वारा एकेकाळचे लुप्त होत गेलेले सहकार क्षेत्र परत उर्जितावस्थेत यायला लागले आहे. सद्याच्या मी आणि कुटुंब याला फाटा देतानाच त्याच्या पुढे जाऊन सभपती रमेश तवडकर यानी हे काम केले आहे. राजकारण हे केवळ सत्ता भोगण्ण्याचे साधन नसून राजकारण हे समाजाची सेवा करण्याचे साधन आहे. समाजाला दिशा देण्याचे काम आहे. चांगल्या व्यक्ती खूप असतात मात्र कार्य करणाऱ्या कमी असतात. या दोघांचा बऱ्यापैकी वापर श्री. तवडकर यानी केला असल्याचे मत श्री. श्रीपाद नाईक यानी व्यक्त केले.
श्री. सदानंद शेट तानावडे
समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत योजना पोचवून स्वयंपूर्ण गोव्याचे स्वप्न स्भापती रमेश तवडकर यानी खऱ्या अर्थाने पूर्ण केलेल असून पक्षाचे आणि सरकारचे त्यांच्या विधायक गोष्टींना नेहमीच प्रोत्साहन मिळेल असे मत गोवा प्रदेश भाजपाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यानी यावेळी व्यक्त केले.
सभापती रमेश तवडकर
आपल्या गोव्यातील प्रत्येक व्यक्ती स्वंयपूर्ण आणि आत्मनिर्भर असायला हवी असा नारा देत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत काम करताना दिसतात. त्यांचा आदर्श त्याच प्रमाणे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे सतत काम करण्याची पद्धत याने आपल्याला प्रेरणा मिळाली. आपल्या मतदार संघात हलाखीचे दिवस काढणाऱ्या लोकांचे हाल आपण पाहिले आहेत. आणि त्यातूनच श्रमधाम संकल्पना पुढे आली येणाऱ्या चार वर्षांत आपले कार्यकर्ते आणि दानशूर व्यक्तींच्या बळावर काणकोण मतदार संघात 200 घरे बांधून देण्याचा संकल्प सभापती रमेश तवडकर यानी आपल्या स्वागताच्या भाषणातून व्यक्त केला.
सभापती ओम बिर्ला यानी अर्धफोंड येथील श्री. हरिश्चंद्र नाईक यांच्या घराला भेट दिल्यानंतर आमोणे आदर्श ग्रामातील आश्रम शाळेला मेट दिली. या ठिकाणी शालेय कर्मचाऱ्यांनी त्यांचे उत्तम असे स्वागत केले. शाळेतील मुलांशी श्री. बिर्ला यानी बातचित केली. या प्रकाराने आपण भारावून गेलो. ज्या व्यक्तींना घराच्या चाव्या दिल्या त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून आनंद होतानाच त्यांच्या परिस्थितीची कल्पना आली. त्यापूर्वी या सर्व घरा संबधीचा माहिती पट प्रदर्शित करण्यात आला तर या संकल्पनेवर आधारित तयार केलेल्या सचित्र पुस्तेकेचे विमोचन करण्यात आले. या पुस्तिकेचे संपादन पत्रकार प्रभाकर ढगे यानी केले असुन यावेळी सभापती श्री. बिर्ला यांच्या हस्ते त्याना पुस्तेकेची प्रत प्रदान करण्यात आली. तर संपूर्ण घरांचा आराखडा तयार केलेल्या अभियंता विनय तुबकी यांचा सभापती श्री. बिर्ला यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. लोकसभेचे सभापती श्री. बिर्ला यांची काणकोण तालुक्यातील ही पहिलीच भेट असल्यामुळे बलराम शिक्षण संस्थेतर्फे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते त्यांचा शाल आणि पारंपारिक समई देऊन गौरव करण्यात आला.
श्रमधाम संकल्पनेतून तयार झालेली घरे
हरिश्चंद्र नाईक पासल, आरती गडकर मासतीमळ, नागी वरक दाबेल, कमलाकर गावकर ब•s, वनिता विठ्ठल गावकर ब•s, तनुजा धुरी किंदळेबाग, देवयानी पागी किंदळेबाग, प्रीती पागी किंदळेंबाग, निर्मला पागी कराशिरमळ, सुजाता पागी धवखाजन, कुशावती भगत कुंभेगाळ, विनंती वेळीप, मुडचेळी, बातु गावकर बडसरे, पोमु मिराशी झिलतावाडी, इराबेल फर्नाडिस पाळोळे, मॅथ्यू रिबेलो कराशिरमळ, सातू गावकर गुळे, सावी नावी झोरो पेडे, प्रिया देसाई किदंळे, प्रेमानंद रायकर चापोली यांचा समावेश आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन संजय गावकर, आलोख मोडक, कविता गावकर, रेषा खोलकर, श्रद्धा नाईक, दामोदर वेळीप, अशोक गावकर, प्रीतल फर्नाडिस, रिचा पोळेकर, सुविधा कोमरपंत यानी केले. विशाल देसाई यानी स्वागत तर दिवाकर पागी यानी आभार मानले.