बेळगाव : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या चा गजर व फटाक्यांची आतषबाजी करत अनगोळ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूक पार पडली. येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीदेखील रात्री उशिरानेच मिरवणुकीला सुऊवात केली. सार्वजनिक मंडळांनी लिलाव उशिराने सुरू केला. त्यामुळेच मिरवणुकीलाहीउशीर झाला. अनगोळ नाथ पै नगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरसमोरील भक्त पुंडलिक तलाव येथे काही मंडळांनी मूर्तींचे विसर्जन केले. आंबेडकर गल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सर्वप्रथम गणेशमूर्तींचे विसर्जन केले. त्यानंतर लक्ष्मी गल्ली, महात्मा गांधी स्मारक तसेच इतर मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी भक्तिभावाने पूजा, अर्चा करून गणपती बाप्पा मोरया म्हणत बाप्पांना निरोप देण्यात आला. आझाद युवक मंडळ, हणमण्णावर गल्ली, मृत्युंजयनगर येथील सिद्धकला युथ क्लब, जय महाराष्ट्र चौक गणेशोत्सव मंडळ, शिवशक्तीनगर, संभाजी चौक-विद्यानगर यांनी उशिराने मंडपातून श्रीमूर्ती बाहेर काढली. याचबरोबर राजहंस गल्ली येथील मंडळानेही रात्री उशिरा मिरवणुकीला सुऊवात केली. कपिलेश्वर तलावामध्ये या मंडळांनी गणेश विसर्जन केले आहे. बहुसंख्य गणेशोत्सव मंडळांसमोर ढोल-ताशा पथक तर काही मंडळांनी डीजेच्या तालावरच मिरवणूक काढली होती.
Previous Articleशहापूर येथे पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक
Next Article सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.