पुलाची शिरोली / वार्ताहर
जालना येथे मराठी आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या निषेधार्थ गांव बंद आंदोलन शांततेत पार पडले. या घटनेच्या निषेधार्थ शिरोली येथे सकल मराठा समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्यावतीने पोलीस प्रशासनाचा व राज्य शासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राजू किसन आवळे यांच्यावतीने सांगली फाटा येथे शासन व पोलीस प्रशासन यांच्या निषेधाच्या व मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. गावातील निषेध सभेवेळी सरपंच पद्मजा करपे, उपसरपंच अविनाश कोळी , सुरेश यादव, नितीन चव्हाण, अर्जुन चौगुले, संघटक प्रशांत पाटील अनिल खवरे आदींची निषेधाची भाषणे झाली,
सकाळी ६ ते संध्याकाळी ६ पर्यंत गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी ज्योतीराम पोर्लेकर, सतीश रेडेकर, हरी पुजारी, ग्रा पं. सदस्य शक्ती यादव ,संतोष यादव,योगेश खाडे ,युवराज चव्हाण ,संपत डांगे, विशाल खोचीकर,संदीप जाधव आदी उपस्थित होते.